पारनेर आरोग्य विभागालाच सलाईनची गरज 

मार्तंड बुचुडे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पारनेर : डॉक्‍टरांच्या अनेक जागा रिक्त असल्याने पारनेर तालुक्‍यातील आरोग्य विभागालाच आता सलाईन लावण्याची गरज निर्माण झाली आहे. पारनेरमधील बहुतेक रुग्णालयांत डॉक्‍टरांची संख्या पुरेशी नसल्याने गोरगरीब कुटुंबांतील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. डॉक्‍टरांअभावी रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन महागडे स्वरूपातील उपचार करून घ्यावे लागत आहेत. 

राळेगणसिद्धी येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. मात्र, तालुक्‍यातील लोकसंख्येचा विचार करता आणखी आरोग्य केंद्रांची गरज आहे. सरकारच्या नियमानुसार 25 हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असावे, असा नियम आहे. 

तालुक्‍यातील पारनेर ग्रामीण रुग्णालयात दोन व टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात चार डॉक्‍टर गरज असताना पारनेर येथे दोन, तर टाकळी ढोकेश्‍वर येथे एकच डॉक्‍टर येथील जबाबदारी सांभाळत आहेत. सात प्राथमिक आरोग्य केंद्रांतही पाच डॉक्‍टरांच्या जागा रिक्त आहेत. डॉक्‍टरांची संख्या कमी असल्याने रुग्णांना उपचारासाठी ताटकळत बसावे लागते. 
राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास विशेष खास बाब म्हणून तातडीने सरकारने परवानगी दिली आहे. आम्ही जिल्ह्यातील 20 गावांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यात पारनेर तालुक्‍यातील ढवळपुरी येथील प्रस्तावसुद्धा आहे. या उर्वरित गावांना लवकरच परवानगी मिळेल. 
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी 

ग्रामीण रुग्णालय - 2 
प्राथमिक आरोग्य केंद्र - 7 
उपकेंद्र आहेत - 42 

डॉक्‍टरांच्या एकूण रिक्त जागा - 10 
आरोग्यसेवक रिक्त जागा - 10 
आरोग्य सेविका रिक्त जागा - 5 

Web Title: parner health center is in bad condition