पारनेर तालुक्‍यात छावणी संस्थांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

पारनेर - पारनेर, सुपे, वाडेगव्हाण, भाळवणी व निघोज या मंडळातील 41 चारा छावण्यांवर दंडाचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यापैकी 23 संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित पाच छावणीचालक संस्थांचे न्यायालयात दावे प्रलंबित आहेत. काही संस्थांच्या एकापेक्षा अधिक ठिकाणी छावण्या असल्याने 28 छावणीचालक व 3 संस्थांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

तालुक्‍यातील सन 2012-13 व 2013-14 या दोन वर्षांत तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थिती असताना विविध संस्थांनी चार छावण्या सुरू केल्या होत्या. त्यांनी कराराप्रमाणे नियम न पाळल्याने अनियमितता व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश न पाळल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार भारती सागरे यांनी दिली आहे.

Web Title: parner news fodder depo organisation crime