राज्य सरकारी कर्मचारी संपात पारनेर तालुका शिक्षक संघ सहभागी : प्रविण ठुबे

सनी सोनावळे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

टाकळी ढोकेश्वर : शासनाकडे गेली अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून 
राज्यातील सर्व संघटनांनी (ता.७) पासुन तिन दिवसांचा संप पुकारलेला आहे. या संपात प्राथमिक शिक्षक संघ सहभागी होणार आहे अशी माहीती संघाचे अध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिली.

ठुबे म्हणाले, या संपा संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची तातडीची बैठक राज्याचे नेते संभाजी थोरात यांचे अध्यक्षतेखाली पार पडून या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रामुख्याने ७ वा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, सेवानिवृत्ती वय वर्ष ६० करावे, बालसंगोपण रजा २वर्ष करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा यासंह अन्य मागण्यांकरता राज्यातील सर्व संघटनांनी संप पुकारलेला आहे.

संघाचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहकले, विभागीय अध्यक्ष आबा जगताप, जिल्हाध्यक्ष संजय शेळके, बापू तांबे, रावसाहेब सुंबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येईल. तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

Web Title: Parner Taluka Teachers Association participating in the state government employee