राज्य सरकारी कर्मचारी संपात शिक्षक संघ सहभागीः ठुबे

सनी सोनावळे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

(टाकळी ढोकेश्वर): शासनाकडे गेली अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबीत असून, राज्यातील सर्व संघटनांनी (ता. 7) पासून तीन दिवसांचा संप पुकारलेला आहे. या संपात प्राथमिक शिक्षक संघ सहभागी होणार आहे, अशी माहीती संघाचे अध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिली.

ठुबे म्हणाले, या संपा संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची तातडीची बैठक राज्याचे नेते संभाजी थोरात यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रामुख्याने 7 वा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, सेवानिवृत्ती वय वर्ष 60 करावे, बालसंगोपण रजा 2 वर्ष करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा यासंह अन्य मागण्यांकरता राज्यातील सर्व संघटनांनी संप पुकारलेला आहे. संघाचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहकले, विभागीय अध्यक्ष आबा जगताप, जिल्हाध्यक्ष संजय शेळके, बापू तांबे, रावसाहेब सुंबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येईल. तालुक्यातील सर्वच शिक्षकांनी या संपात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

Web Title: parner teachers team participants in state government employees strike