पार्थ पवार यांचे शनिदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव युवा नेते पार्थ पवार यांनी आज शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेऊन अभिषेक केला. 

नेवासे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव युवा नेते पार्थ पवार यांनी आज शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेऊन अभिषेक केला. 

पार्थ पवार यांचे आज दुपारी शनिशिंगणापूर येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे नातू, ज्ञानेश्वर उद्योगसमूहाचे तज्ज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, "राष्ट्रवादी'चे कार्याध्यक्ष दादा गंडाळ, शनैश्‍वर देवस्थानाचे विश्वस्त राजेंद्र लांडे आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
ज्ञानेश्‍वर उद्योगसमूह व तालुका "राष्ट्रवादी'तर्फे डॉ. क्षितिज घुले यांनी पार्थ पवार यांना लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या जीवनावरील, "मनामनातील मारुतराव घुले पाटील' हे पुस्तक भेट दिले. शनैश्‍वर देवस्थानातर्फे राजेंद्र लांडे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी पवार व घुले या युवा नेत्यांमध्ये पक्षबांधणी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र, राजकीय विषयावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parth Pawar's Shani Darshan