Vidhan Sabha 2019 : 'नारायण आबा, तुम्ही राष्ट्रवादीत जा!'

अशोक मुरुमकर
Wednesday, 2 October 2019

आमदार नारायण पाटील यांचे कार्यकर्ते नाराज झाले असून 'आता कसं, आबा म्हणतील तसं', असं म्हणत आबांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा असा सल्ला सोशल मीडीयातून दिला जात आहे.

सोलापूर : राष्ट्रवादीतून नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आमदार नारायण पाटील यांचे कार्यकर्ते नाराज झाले असून 'आता कसं, आबा म्हणतील तसं', असं म्हणत आबांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा असा सल्ला सोशल मीडीयातून दिला जात आहे.

2014च्या विधानसभा निवडणूकीत करमाळा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आमदार पाटील निवडून आले होते. यावेळी शिवसेना व भाजप यांची युती नव्हती. तेव्हा त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून रश्मी बागल रिंगणात होत्या. त्यात पाटील विजयी झाले होते. दरम्यान 2019ची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आमदार पाटील यांना की, बागल यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार याची उत्सुकता लागली होती.

No photo description available.

आमदार पाटील यांनी प्रमाणिकपणे काम केले असून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा असणाऱ्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेनी बागल यांना ऐनवेळी उमेदवारी दिल्याने भ्रमनिरास झाला आहे. सोशल मीडीयावर शिवसेनेबद्दल संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या असून आता आबांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी घ्यावी, असा सल्ला देत आहेत. बागल यांनी त्यांना मिळालेल्या एबी फॉर्मचे फोटो त्यांच्या फेसबुक वॉलवर टाकले आहेत.

Image may contain: text

आबांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत श्रीनाथ घाडगे यांनी त्यांच्या फेसबुक वाॅलवर म्हटले की, नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करमाळा माढा विधानसभा लढवावी. शेवटी  सेनेने दाखवून दिली. तिकीट कशावर देतात. तात्यासाहेब शिंदे यांनी म्हटले की, आज मातोश्री खेकड्याने झुकवली.. आम्ही मावळे नारायणसेनेचे आबा तुमची सदैव मान ताट ठेवणार.. प्रदीप हाके यांनी म्हटले की, जनतेच्या मनात आबाच पुन्हा. रविराज पाटील यांनी म्हटले की, रश्मी बागल - शिवसेना, संजय शिंदे - अपक्ष, दशरथ कांबळे - वंचित, नारायण पाटील अपक्ष की राष्ट्रवादीकडून? संध्याकाळपर्यंत निर्णय, हो मी नारायण आबा पाटील समर्थक अशा पोस्टनी आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे फेसबुक वॉल सजले आहेत. तर बागल यांच्या उमेदवारीने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्यांचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: party workers ask to narayan patil for leave the party and join the NCP