सुधाकर परिचारकांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

भारत नागणे
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

पंढरपूर : एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. परिचारकांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

सुधाकर परिचारकांचे कट्टर समर्थक वसंत देशमुख यांच्या कासेगावातच राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांना तब्बल 1200 मतांची आघाडी मिळाली आहे. अनेक वर्षांपासून
कासेगाव हे परिचारकांना मानणारे गाव म्हणून ओळखले जाते. गावचे महत्व ओळखून येथील कार्यकर्त्यांना परिचारकांनी नेहमीच जुकते माफ दिले आहे.

वसंत देशमुख हे परिचारकांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. देशमुख हे मागील पाच वर्षांपासून श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षपदावर काम करत आहे. त्यांच्याकडे कारखान्याचे उपाध्यक्षपद असताना ही पुन्हा त्यांना परिचारकांनी कासेगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देवून त्यांना निवडून आणले.

पंचायत समिती सदस्य, साखर कारखान्याचे दोन संचालक अशी महत्वाची पदे एकाच गावात असताना विरोधी उमेदवाराला आघाडी मिळाल्याचे शल्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे.
परिचारक गटाकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, बँका, दोन साखर कारखाने अशी सत्तास्थाने असताना ही राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके विजयी झाल्याने परिचारकांच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे.

कासेगावातून विरोधी उमेदवार भारत भालके यांना आघाडी मिळाल्याची जबाबदारी घेत वसंत देशमुख यांनी आज पांडुरंग साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांच्याकडे दिला आहे.
सुधाकर परिचारक हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या पराभवामुळे परिचारक गटाचे कार्यकर्त्येते अस्वस्थ झाले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Party Workers Nervous after Defeated Sudhakar Paricharak