सांगली जिल्ह्यामधील ताकारी गावातील विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश

सकाळ वृत्तसेवा | Friday, 31 July 2020

विद्यालयाने सलग अकरा वर्षे सेमी इंग्रजीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून उज्ज्वल यश संपादन केले. 

सांगली - श्री पार्वती खेमचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर ताकारीचा दहावी मार्च 2020 परीक्षेचा निकाल 96.77 टक्के लागला आहे. शिवाय विद्यालयाने सलग अकरा वर्षे सेमी इंग्रजीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून उज्ज्वल यश संपादन केले. 

आदित्य प्रसाद हसबनीस याने 99.40 टक्के असे विक्रमी गुण मिळवून भवानीनगर केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला  तर सानिया जुबेर पटवेकर हिने 98% व अर्पिता अजित  तावरे हीने 96 .20% गुण मिळवून विद्यालयात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. 14 विद्यार्थी 90 %पेक्षा अधिक गुण मिळून तर 37 विद्यार्थी 75 % पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अल्पना थोरात व पर्यवेक्षिका तावरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  गु .र .टा. शिक्षण संस्थेचे चेअरमन बी. डी. भोसले, व्हाईस चेअरमन एस. बी. बेळवी आणि सचिव एन. एन. पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. 

हे पण वाचा 'साहेब माझ्या मुलाचा स्वॅब घ्या, तो पण पॉझिटिव्ह आला तर सोयीच होईल...'

 
 

संपादन - धनाजी सुर्वे