कऱ्हाड आगारातुन बसफेऱ्या अचानक बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कऱ्हाड - येथील आगारातुन सुरु असणाऱ्या अनेक गावच्या बसफेऱ्या अचानक बंद केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यामुळे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, अंध-अंपग आदिंना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. बसफेऱ्या बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करुन तातडीने बससेवा पुर्ववत करावी, अन्यथा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला. 

निवेदनातील माहिती अशी 
येथील आगारातुन रेठरे बुद्रुक, घोणशी, वडगाव हवेली, शेरे, दुशेरे, काले-मसुर आदिसह अन्य गावातील एसटीच्या बसफेऱ्या सोडण्यात येतात. मात्र कोणतीही सुचना न देताना अचानक यातील काही फेऱ्या बंद करण्यात आल्या तर काही फेऱ्या कमी करण्यात आल्या. त्यामुळे दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, अंध-अंपग आदिंची गैरसोय होवुन त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. 

त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी उत्पन्न कमी असल्याचे सांगुन उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आज प्रत्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, तालुका प्रमुख शशिकांत हापसे, नितीन काशिद, ग्राहक संरक्षण कक्षाचे राजेंद्र माने, बापुराव भिसे, प्रविण लोहार, बाबासाहेब बनसोडे, सुरेश घाटगे, काकासाहेब जाधव आदिंसह पदाधिकारी वकार्यकर्त्यांनी एसटीच्या आगार व्यवस्थापकांना त्याची विचारणा करुन बसफेऱ्या बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करुन तातडीने बससेवा पुर्ववत करावी असे म्हटले आहे. अन्यथा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनाव्दारे देण्यात आला

Web Title: passengers due to sudden closure of the Karhad bus