माढ्यात होणार पासपोर्ट कार्यालय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

माढा - माढ्यात पासपोर्ट कार्यालयास परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिल्याची माहिती माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने सतत पाठपुरावा केल्याने माढा शहरात पासपोर्ट कार्यालय होण्यास परराष्ट्र खात्याने मंजुरी दिली आहे. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुणे, सोलापूर येथे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. माढ्यासह राज्यातील बारामती, अमरावती, अकोला, चंद्रपूर या कार्यालयांना आज (ता. 17) केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्याने मंजुरी दिली आहे.
Web Title: passport office in madha