सरपंच-उपसरपंचही 'बसतात' उघड्यावर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पाथर्डी - जाटदेवळे ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांकडे शौचालये नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जाटदेवळे हे देशात सर्वांत कमी शौचालये असणारे गाव आहे. तेथे सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्याच घरी शौचालये नसल्याचे पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाच्या निदर्शनास आले आहे.

काही सदस्य शौचालयांचा वापर अंघोळीसाठी करीत असल्याचे निदर्शनास आले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके व गुड मॉर्निंग पथकातील ग्रामसेवकांनी आठ सदस्यांकडे शौचालये नसल्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारीसाठी, शौचालय असावे, अशी अट होती; मग सदस्यांना शौचालये असल्याचा दाखला देणारे ग्रामसेवक कोण? त्याच्यावर पंचायत समितीने कारवाई का केली नाही, हा प्रश्‍न यामुळे उपस्थित झाला आहे.

Web Title: pathardi nagar news sarpanch & dy. sarpanch open toilet