कऱ्हाड - दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून रूग्णाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

कऱ्हाड : येथील कृष्णा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी नऊच्या सुमारास घटना घडली. संदीप भागोजी शेळके (वय 27, रा. बोद्रेनगर, कोल्हापूर) असे संबंधिताचे नाव आहे. संदीप यास कर्करोग झाला होता. त्याच्या उपचारासाठी काल संदीपला कृष्णा रूग्णालयात दाखल केले होते. 

पोलिसांनी सांगितले की, संदीप याचे करवीर तालुक्यातील बोंद्रेवाडी मुळ गाव आहे. अनेक दिवसांपासून त्याला कर्करोगाचा त्रास होता. त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. काल त्याला येथील कृष्णा रूग्णलयात दाखल केले होते. त्याच्यावर दुसऱ्या मजल्यावरील वाॅर्डमध्ये उपचार सुरू होते. सकाळी साडेसातनंतर संदीपने येथील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याने उडी मारल्यानंतर तेथे खळबळ उडाली. त्याला त्वरीत अतीदक्षता विभागात उपचारास नेण्यात आले. मात्र उपाचार सुरू असताना त्याचा साडेनऊच्या सुमारास मृत्यू झाला. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला आहे. दुपारी उत्तरीय तपासणीनंतर संदीपचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संदीप याला कर्करोग होता. त्यावर उपचार सुरू होते. असा जबाब संदीपच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिला आहे, असे हवालदार राजेश देशमुख यांनी सांगितले.

Web Title: a patient suicide in hospital jump from 2nd floor