सांगली- शासकीय रूग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन रुग्णाने मारली उडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

सांगली : सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका रूग्णाने केला. अनिल केशव माने (वय 55) असे त्यांचे नाव असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

सांगलीतील शंभर फुटी रोडवरील आप्पासाहेब पाटील नगरमध्ये अनिल माने राहतात. त्यांना चार दिवसांपीपुर्वी यकृताचा त्रास होवू लागल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. ते रूग्णालयाच्या वॉर्ड 59 मध्ये होते. 
आज सकाळी डॉक्‍टर रूग्ण तपासणीसाठी वॉर्डात आले होते. त्यांनी माने यांची चौकशी केली. यावेळी त्यांचा मुलगा तेथे होता. डॉक्‍टरने मुलास पुढील उपचाराची माहिती दिली. ती ऐकल्यावर आपल्याला आणखी त्रास होईल या भितीने ते रूग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गेले तेथून त्यांनी उडी मारली. अचानक घडलेल्या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली. 

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने माने यांचा उजवा पाय फ्रॅक्‍चर झाला. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर उपचारसुरू आहेत.

Web Title: patient take a jump from 3rd floor of civil hospital of sangali