रुग्ण दवाखान्यात आला की दगावता कामा नये ः जयंत पाटील 

अजित झळके
Friday, 4 September 2020

कोरोना बाधित रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल झाला तर तो जगला पाहिजे. तो दगावता कामा नये आणि त्यासाठी सर्व ती काळजी डॉक्‍टरांनी घेतली पाहिजे. सांगलीत काही ठिकाणी तसे होताना मला दिसत नाही.

सांगली ः कोरोना बाधित रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल झाला तर तो जगला पाहिजे. तो दगावता कामा नये आणि त्यासाठी सर्व ती काळजी डॉक्‍टरांनी घेतली पाहिजे. सांगलीत काही ठिकाणी तसे होताना मला दिसत नाही. हे योग्य नाही, अशा शब्दांत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज कोरोना मृत्यूदराबाबत महत्वाचे विधान केले. 

येथील श्री भगवान महावीर कोविड सेंटरचे उद्‌घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर महत्वाचे भाष्य केले. ते म्हणाले, ""जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची मृत्यूची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. हे प्रमाण कमी झाले पाहिजे. रुग्णांचा जीव वाचला पाहिजे. जर रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल झाला तर त्याला उपचार मिळालेच पाहिजेत आणि त्यासाठी आवश्‍यक ते सारे डॉक्‍टरांनी केले पाहिजे.

त्यासाठी कोविडच्या तज्ज्ञांचा सल्लाही डॉक्‍टरांनी घ्यावी. इस्लामपूरमध्ये आज तशी सुविधा आम्ही सुरु केली. सांगलीत ऐनवेळी काही गरज लागली तर डॉक्‍टरांनी तशा यंत्रणेचा वापर करावा. माझे एक मित्र मुंबईतील तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत. त्यांचीही मदत आपण घेऊ शकतो. पण, रुग्ण दगावता कामा नये.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The patient when he comes to the hospital....: Jayant Patil