Loksabha 2019 : पवार कुटुंबात कलह हे विरोधकांचे दिवास्वप्न - राजेंद्र पवार

प्रा. प्रशांत चवरे
गुरुवार, 4 एप्रिल 2019

भिगवण - देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रांमध्ये येऊन पाच वर्षामध्ये काय विकासकामे केली हे न सांगता पवार कुटुंबात कलह निर्माण झाला असे सांगतात त्यावरुनच केंद्र व राज्य सरकारचे अपयश लक्षात येते. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये केलेले विकासाचे वायदे फोल ठरल्यामुळेच मोदींकडुन पवार कुटुंबास लक्ष करण्यात येत आहेत. पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांमध्ये विश्वासाचे वातावरण असुन, कुटुंबामध्ये कलह हे विरोधकांचे दिवास्वप्न कधीच पूर्ण होणार नाही अशी टीका बारामती अॅग्रीक्लरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केली.

येथील दुर्गादेवी मंदिरांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बारामती लोकसभा मतदार संघातील उमेद्वार सुप्रिया सुळे यांचे प्रचारार्थ इंदापुर तालुक्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. माजी सभापती रमेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, अॅड. महेश देवकाते, शंकरराव गायकवाड, आबासाहेब देवकाते, धनाजी थोरात, खंडेराव गाडे, बापुराव थोरात, विजयकुमार गायकवाड, नानासाहेब बंडगर, राजेंद्र देवकाते, जावेद शेख, हेमाताई माडगे, सरपंच अश्विनी शेंडगे,उपसरपंच रेखाताई पाचांगणे उपस्थित होते.

श्री. पवार पुढे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हा देश उभारणीमध्ये मोठे योगदान आहे. पाच वर्ष केंद्रात व राज्यात सत्ता असतानाही अनेक मतदार संघात भाजपला उमेदवार मिळत नाहीत त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील नेत्यांची पोरं व नातवंडे शोधण्याची मोहिम भाजपने हाती घेतली आहे. नोटबंदी, जी.एस.टी सारख्या योजना फसल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. सुशिक्षित बरोजगार युवक सत्ताधाऱ्यांचा पराभव करतील. 

रमेश जाधव, हनुमंत बंडगर, अॅड. महेश देवकाते, रियाज शेख, रमेश धवडे यांनी मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक महेश शेंडगे यांनी, सुत्रसंचालन सचिन बोगावत यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप वाकसे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन अजिंक्य माडगे, जयदिप जाधव, संदीप वाकसे, तुषार क्षीरसागर, निखील बोगावत, हेमंत निंबाळकर, सुरेश बिबे यांनी केले. 

Web Title: Pawar family can not be divided says Rajendra Pawar