'या' आमदाराला मंत्रीपद देण्याचे पवारांचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

ज्येष्ठ नेते य़शवंतराव चव्हाण यांची आज (साेमवार) पुण्यतिथी आहे. त्या निमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार कऱ्हाड येथे आले हाेते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. 

कऱ्हाड : खूप काही बोलावे अशी तुमची इच्छा आहे, मात्र मला मुंबईला जायचे आहे. तिथे लोक माझी वाट पाहत आहेत. तिथे गेल्यानंतर सर्वकाही नीटनेटके करणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला एक विनंती करतो मुंबईतील नीटनेटके केल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांना आपल्या कामातून मोकळे करा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी करत आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपद देण्याचे संकेत दिले. 

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

यशवंतनगर (ता. कराड) येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 45 व्या गळीत हंगामाच्या प्रारंभ तसेच सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते पवार बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक आदी उपस्थित हाेते.

हेही वाचा - म्हणून पवार साहेबांनी फाेन घेणे टाळले

श्री. पवार म्हणाले, मी खूप काही बोलावे अशी तुमची इच्छा आहे, मात्र मला मुंबईला जायचे आहे. लोक माझी वाट पाहत आहेत. तिथे गेल्यानंतर सर्वकाही नीटनेटके करणार आहे.

हेही वाचा ः महाराष्ट्रात महाविकासआघाडीचेच सरकार ः शरद पवार

त्यामुळे काळजी करू नका आणि सगळे काही नीट नेटके केल्यानंतर तुम्हाला एक विनंती करणार आहे, आमदार बाळासाहेब पाटील यांना आपल्या कामातून थोडा वेळ रिकामे करा, असे सांगताच उपस्थित सभासद कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर केला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pawar Hints At Giving 'Minister' To This MLA