शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे मोराला जीवदान

राजकुमार शहा 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

साडी व लाकडांची झोळी करून मोरास विहिरी  बाहेर काढण्यात यश आले आहे,मोर भेदरलेल्या अवस्थेत असून त्यावर मोहोळ येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
- कल्याण भोसले (वनरक्षक,पापरी)

मोहोळ : पापरी (ता. मोहोळ) येथील शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे पन्नास फुट खोल विहिरीत पडलेल्या मोराला साडी व लाकड़ी काठयांची झोळी करून विहीरीतुन काढल्याने त्याला जीवदान मिळाले असुन त्याच्यावर मोहोळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले.

पापरी येथील शेतकरी संजय मधुकर गायकवाड़ यांचे येवती रस्त्यालगत  शेत आहे, शेतात  45 ते 50 फुट खोल एक विहीर आहे,या विहिरीला पायऱ्या नाहीत,सध्या त्यामधे 8 ते 10 फुट पाणी आहे.

सोमवारी ता 3 रोजी सकाळी संजय गायकवाड़ हे कामासाठी बाहेरगावी गेल्याने त्यांनी शेजारील शेतकरी हनुमन्त जाधव यांना विद्युत् मोटार सुरु करायला लावली होती.जाधव हे मोटार सुरु करण्यासाठी विहीरीकडे गेले असता  त्यांना विहिरित मोर पडलेला दिसला, तो भयभीत व गारठलेल्या अवस्थेत पाण्यात तरंगत होता.अगोदरच भेदरलेला व गारठलेला  मोर विद्युत मोटार सुरु केल्यावर आणखी जास्तच  घाबरेल म्हणून त्यांनी विद्युत मोटार सुरू केली नाही.

जाधव यांनी ही माहिती संजय गायकवाड़ यांना सांगितली,गायकवाड़ यांनी वन विभागाचे वनरक्षक कल्याण भोसले यांच्याशी संपर्क साधला,कल्याण भोसले हे आपले सहकारी भारत माळी यांना घेवून घटना स्थळावर  गेले.विहीर खोल व बिगर पायऱ्यांची असल्याने खाली दोराने उतरायला कोण धजावत नव्हते  ,तेव्हा त्यांना परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधुन एक युक्ति केली.  साडी व चार लाकडी काठ्या आणून त्याची झोळी केली ती विहिरित सोडली व  मोरास सुखरूप  बाहेर  काढले.शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला असता  मोराच्या अवस्थे वरुन तो रविवारी   मध्य रात्री विहीरीत  पडला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवीली.

या कामी वनविभागाच्या  कर्मच्याऱ्यांना रामचन्द्र मते,हनुमंत जाधव,औदुंबर नागटिळक,मुजमुले बागवान,आदि शेतकरी व शेत मजुरांचे सहकार्य लाभले.

साडी व लाकडांची झोळी करून मोरास विहिरी  बाहेर काढण्यात यश आले आहे,मोर भेदरलेल्या अवस्थेत असून त्यावर मोहोळ येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
- कल्याण भोसले (वनरक्षक,पापरी)

मोरावर प्राथमिक उपचार केले आहेत , गारठल्यामुळे त्याचे डोळे सुजले आहेत . तो लवकर चांगला होईल.
- डॉ अतुल चुकेवार ( पशुधन विकास आधिकारी मोहोळ)

Web Title: peacock life saves in Mohol