सोलापुरात अस्वच्छता करणाऱ्या 295 जणांना सव्वा लाखांचा दंड 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 6 जुलै 2018

सोलापूर : शहराच्या विविध भागात अस्वच्छता केलेल्या 295 जणांकडून सुमारे सव्वालाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पालिकेच्या आठ विभागीय कार्यालयांतर्गत  ही मोहीम राबविण्यात आली. 

रस्त्यावर घाण केली किंवा उघड्यावर शौच केल्यास 500 रुपये दंड केला जाणार आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 295 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाने डिसेंबर 2017 मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. प्रत्येक झोनमध्ये वसुलीसाठी खास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत ही वसुली केली जात आहे. 

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी विभागातील कचरामुक्त शहरांना आता तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) दिले जाणार आहे. त्यासाठी 12 निकष निश्‍चित करण्यात आले असून, प्रत्येक वर्षी पुनर्मूल्यांकन व पुनर्प्रमाणिकरण केले जाणार आहे. या निकषांत अस्वच्छतेबाबत केलेल्या दंडाची कार्यवाही किती झाली, याचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू आहे. 

सोलापूर शहर हे हागणदारीमुक्त झाले असल्याने शहराच्या हद्दीत नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये. कचरा घंटागाड्यातच टाकावा, उघड्यावर कचरा टाकू नये व घाण करू नये तसेच उघड्यावर लघुशंकाही करू नये, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत. या कारवाईसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहेत. 

झोन तीनअंतर्गत 162 जणांना दंड 
झोन तीनअंतर्गत 162 जणांना दंड करण्यात आला. त्यांच्याकडून 24 हजार 450 रुपये दंड वसूल करण्यात आला. या झोनमध्ये प्रभाग पाच, सहा, 15, 16, 20 व 21 चा समावेश आहे. पैकी प्रभाग 16 मध्ये एकाही व्यक्तीवर दंडात्मक कारवाई झाली नाही, तर प्रभाग 20 मध्ये सर्वाधिक 39 जणांवर कारवाई झाली. 

Web Title: penalty of 1.25 lakhs to 295 people for uncleanness in solpaur