प्लास्टिक वापरामुळे सोलापुरातील 137 व्यापाऱ्यांना दंड 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत 23 जून ते 31 जुलै या कालावधीत 1499 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. 137 व्यापाऱ्यांवर कारवाई करून सुमारे सहा लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पाच हजार दंड होऊनही पुन्हा प्लास्टिक सापडलेल्या एका दुकादाराला 10 हजारांचा दंड झाला. 

सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत 23 जून ते 31 जुलै या कालावधीत 1499 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. 137 व्यापाऱ्यांवर कारवाई करून सुमारे सहा लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पाच हजार दंड होऊनही पुन्हा प्लास्टिक सापडलेल्या एका दुकादाराला 10 हजारांचा दंड झाला. 

राज्य शासनाने 23 जूनपासून प्लास्टिक वापरावर बंदी घातली. कारवाईचे अधिकार महापालिकेस दिले. अन्न परवाना विभागाकडून तसेच विशेष पथकाकडून शहरातील विविध ठिकाणी छापा टाकून प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. चार महिन्यांपूर्वी शासनाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतर त्यावेळीही महापालिकेच्या अन्न परवाना विभागाकडून शहरात विविध ठिकाणी छापा घालून कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी दोन हजार 800 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. या पिशव्यांचा वापर शहरातील अथर्व गार्डन ते चाटला साडी सेंटरपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी करण्यात आला होता. आताही जप्त प्लास्टिक पिशव्यांचा वापर शहरात होणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये करण्यात येणार आहे. 

प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीवर सर्वसामान्य नागरिकांकडून ओरड व व्यापाऱ्यांकडून उठाव झाल्यानंतर शासनाने दुसरे परिपत्रक काढून पॅकिंग होणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. तसेच किराणा दुकान आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनाही तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्यांदा कारवाई करण्यासाठी 10 पथके तयार करण्यात आली असून दंड झालेल्या दुकानांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. 

आकडे बोलतात... 
कालावधी - 23 जून ते 31 जुलै 
तपासलेली दुकाने - 1698 
दंड झालेले व्यापारी - 137 
वसूल झालेला दंड - 6.90 लाख रुपये 
जप्त केलेले प्लास्टिक - 1499 किलो 
नोटीस दिलेले दुकानदार - 656

Web Title: penalty to 137 merchants for using plastic in solapur