बांधकाम विभागाला दंड, घनकचरा विभागाची कारवाई 

विठ्ठल लांडगे
शुक्रवार, 6 जुलै 2018

नगर : नगर-औरंगाबाद रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या साफसफाईत निघालेला कचरा पेटविल्याबद्दल महापालिकेने 200 रुपयांचा दंड वसूल केला. महापालिका मुख्यालयासमोरच बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. तीन) कचरा पेटविल्याने तेथे मोठी धूरकोंडी झाली होती. याबाबत "सकाळ'ने बुधवारी (ता. 4) सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. 

बांधकाम विभागाच्या जुन्या कार्यालयाची मंगळवारी डागडुजी सुरू होती. त्यातून निघालेला कचरा उचलून नेण्याचा कंटाळा आल्याने कर्मचाऱ्यांनी तो पेटवून दिला. त्यात कार्यालयासमोरील झाडांच्या फांद्याही आगीत टाकल्या जात होत्या. कार्यालयाच्या कौलारू छतावरील पालापाचोळा आगीत ढकलला जात होता. त्यामुळे वाढलेल्या आगीची झळ शेजारच्या काही झाडांनाही बसली. परिसरात धुराचे लोट पसरले होते. रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला. 

दरम्यान, कचऱ्याची राख झाल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी तेथे भेट दिली. बांधकाम विभागाने नव्हे, तर बाहेरील कोणीतरी हा कचरा पेटविल्याचा पवित्रा तेथील अधिकाऱ्यांनी घेतला. त्यावर कार्यालयाची साफसफाई बाहेरील लोक कसे करतील, असा प्रश्‍न घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्यानंतर नरमलेल्या अधिकाऱ्यांनी 200 रुपयांचा दंड भरला. 

कचरा पेटविल्याबद्दल बांधकाम विभागाला नोटीस बजाविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनी नोटीस पाठविण्यापूर्वी कचरा पेटविल्याबद्दल दंडाची 200 रुपयांची पावती केली. त्यामुळे नोटीस पाठविण्याचा निर्णय रद्द केला. 
- डॉ. नरसिंह पैठणकर, विभागप्रमुख, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका 

Web Title: penalty to pwd department by solid waste management