प्रलंबित प्रश्‍नांवर मात करू - महापौर फरास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

कोल्हापूर - कष्ट आणि प्रामाणिकपणा यांची सांगड घालून शहराच्या प्रलंबित प्रश्‍नांवर मात करू, अशी ग्वाही नूतन महापौर हसीना फरास यांनी आज दिली. महापालिकेच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त विठ्ठल रामजी शिंदे चौकात ध्वजवंदन झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला काम करावे लागेल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची सांगड घातल्याशिवाय प्रश्‍न सुटणार नाहीत. प्रलंबित प्रश्‍नांवर मात करून स्मार्ट सिटीचा निर्धार करूया. 

आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती अजिंक्‍य चव्हाण, अफजल पिरजादे, सत्यजित कदम, सुभाष बुचडे, अशोक जाधव, शेखर कुसाळे, दिलीप पोवार, श्रावण फडतारे, संतोष गायकवाड, मेहजबीन सुभेदार यांच्यासह नगरसेवक व अधिकारी या वेळी उपस्थित होते.

देशसेवा तसेच अग्निशमन दलाची सेवा बजावताना वीरमरण आलेल्या जवानांच्या वीरमाता पिता आणि पत्नी यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार झाला. ऊर्मिला मरळे, सुनील कांबळे, सुलोचना रावराणे, कांचनदेवी भोसले, मधुकर वालकर, सुनीता देसाई, आनंदी उलपे, मनीषा सूर्यवंशी, व्यंकोजी शिंदे, शांता चिले, मनीषा जाधव, पार्वतीबाई माने, अंजनी पाटील यांचा सत्कार झाला. 

पाणीपुरवठा विभागाकडील उत्कृष्ट स्पॉट बिल रिडर यांचा पुस्तक व रोप देऊन सत्कार झाला. रवी वडगावकर, सुरेश साळोखे, संजय मिरजे, नरेंद्र पराडे, नारायण तिवले, राजू माने यांचा यात समावेश आहे.

स्मशानभूमीस ३० हजार शेणी
महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे पंचगंगा स्मशानभूमीस ३० हजार शेणी दिल्या. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेणी प्रदान केल्या. पहिल्या वर्षी दहा, दुसऱ्या वर्षी वीस आणि यंदा तीस हजार शेणी दिल्या गेल्या.

Web Title: pending problem solution