सांगली बाजारात फिरताहेत खतरों के खिलाडी

People are Dangerasly roaming in Sangli market
People are Dangerasly roaming in Sangli market

सांगली ः मुंबईत घडलं, तेच पुण्यात घडलं. शेजारी सोलापूरात घडतचं आहे आणि आता अगदी सीमेवर असलेल्या कोल्हापुरातून येत असलेल्या बातम्या ऐकून काळजात धस्स होतं आहे. कोरोनाचे मीटर गतीने धावत आहे. असे असताना आजवर संयम बाळगून असलेली सांगली, इथल्या संयमी सांगलीकर अचानक असा बेफिकिर झालेला पाहून सारे हैराण आहेत.

बाजारपेठ खुली झाली याचा अर्थ सारं संकट संपलं, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आजवर नियंत्रणात असलेली सांगली "कोरोना बझार' ठरण्याची भिती आता दाटू लागली आहे. या पेठांमध्ये शिस्त लागली नाही तर पुन्हा इथे कुलपे घालावी लागतील, किती काळासाठी, माहिती नाही. 

शहरातील चारही पेठा काल खुल्या करण्यात आला. गणपती पेठ आधीपासूनच काही प्रमाणात उघडली गेली होती. वसंतदादा मार्केट यार्डमधील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरु होती. आता आलटून-पालटून पद्धतीने पेठेतील अन्य व्यवहार खुले करण्यात आले आहेत. त्यात हॉटेलना वगळण्यात आले आहे. लोक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत आणि तब्बल 52 दिवसांच्या खंडानंतर व्यापार सुरु झाल्याने व्यापारी उत्साहात आहेत.

तोंडावर ईदसारखा मोठा सण आहे. हे सारे एकाबाजूला आणि कोरोनाचे न संपलेले संकट दुसऱ्या बाजूला आहे. या स्थिती बाजारात संयमाचे दर्शन घडणे गरजेचे होते. ते दिसेना झाले आहे. बाजारपेठा उघडा, यासाठी प्रचंड आग्रही राहिलेली व्यापारी एकता असोसिएशन हे सारे चित्र पाहून काहीशी हतबल झाल्याची काल पहायला मिळाली. अध्यक्ष समीर शहा यांनी तर पुन्हा एकदा पेठा बंद करायला लागू नयेत, याची खबरदारी घ्या, बेशिस्त सोडा, असे जाहीर आवाहन केले. 

या घडीला सांगलीतील पेठांमध्ये सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क याबाबत अत्यंत हलगर्जीपणाचे दर्शन घडताना दिसत आहे. काही मोठी दुकाने, शोरूममध्ये त्याचा वापर होतोय, मात्र छोट्या दुकानांत शिस्त नाही. काही ठिकाणी फेरीवाले रस्त्यावर आले आहेत. त्यांनी सॅनिटायझर ठेवलेले दिसत नाही. 

लाईव्ह अपडेट

  • एक पुस्तक प्रदर्शन दीर्घकाळाने सुरु झाले. तेथे सॅनिटायझर आहे का विचारले. ताईंनी कपाटातून बाटली काढून दाखवली. आता ती काय पुजायची आहे का? 
  • मारुती रस्त्यावरील एका दुकानात लोकर खरेदी केली. व्यापाऱ्यांनी मास्कही वापरला नव्हता आणि सॅनिटायझरचा पत्ताच नव्हता. सोशल डिस्टन्स कशाशी खातात, याचा पत्ताच नव्हता. 
  • चौकाचौकात आंबे विकले जात आहेत. लोक नाकाला लावून वास बघतात. उघड्या हातांनी तपासून बघतात. कसा कोरोना थांबायचा? 
  • कुठून, कसा, कोण जाणे... पण मावा आणि पान सहजी उपलब्ध होताना दिसत आहेत. त्याच्या पिचकाऱ्या बाजारातही दिसत आहेत. 
  • दुकानात गर्दी करून, काऊंटरवर निवांत हात ठेवून खरेदी करण्याची परंपरा कायम आहे. आपल्याभोवती एक संकट आहे, याची जाणीव या बाजारपेठेत कुठेच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com