कऱ्हाड - तोतया अधिकाऱ्यास नागरिकांनी पकडले

fraud1
fraud1

कऱ्हाड : शॉप अॅक्ट अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्याकडे पंधरा हजारांची रक्कम मागणाऱ्या तोतया अधिकाऱ्यास नागरीकांनी शिताफीने पकडले. ओगलेवाडी येथील बाजारपेठेत सायंकाळी पाचच्या सुमारास घटना घडली. संबंधित तोतयाने एका बेकरी चालकास लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र संबधित बेकरी चालकाने दाखवलेल्या प्रसंगवधानाने तो संशयित पकडला गेला. इरपान आब्दुलवाहब पिरजादे (रा. आष्टा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. शंकर निकम (रा. ओगलेवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ती नोदवण्याचे काम सुरू होते. संबंधित संशयितांवर सांगली जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून सातारा जिल्ह्यातील याच प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, शंकर निकम यांची ओगलेवाडी येथे बेकरीचा व्यवसाय आहे. तेथील बाजारपेठेतील पोस्ट ऑफीस शेजारीच त्यांची बेकरी आहे. ते नेहमीप्रमाणे दुपारी बेकरीत बसले होते. त्यावेळी संबदित तोतया अधिकारी त्यांच्याकडे गेला. त्याने मी शॉप अॅक्ट अधिकारी आहे. तुमचा परवाना आहे, का अशी विचारणा करत वेगवेगळ्या परवानग्यांची चौकसी करू लागला. निकम यांनी त्यांना दुकानाचा परवाना दाखवला. मात्र तरिही त्याने त्याला न जुमानता पैशाची मागणी केली,. प्रत्येक दिड हजार असे सात जणांचे पैसे द्यावे लागतील. आमचे साहेब मोठी गाडी घेवून रेल्वे पुलावर थांबले आहेत. त्यामुळे त्वरीत पैसे द्या, असे तो त्यांना म्हणाला. निकम यांना त्याचा संशय आला. त्यांनी पैसे देतो पण साहेबांनाही भेटू असे म्हणताच तो बावचळला. त्याचे बावचळणे त्यांनी हेरले. मग त्याला बोलण्यात गुंगवत श्री. निकम बाहेर आले. त्याच्या दंडाला पकडून सेजारीच असलेल्या पोलिस दुरक्षेत्रात त्याला नेले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. 

त्यावेळी तो तोतया शॉप अॅक्ट अधिकारी अशल्याचे स्पष्ट झाले. निकम यांच्यासह ओघलेवाडी पोलिसांनी त्या संशयाताला घेवून शहर पोलिसात आले. तेथे निकम यांची फिर्याद गेण्यात आली. संशीयताकडे चौकशी केली, त्यावेळी त्याने इरपान आब्दुलवाहब पिरजादे असे नाव असल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. त्यांनी आष्टा पोलिसांकडे त्याची खात्री केली. त्यावेळी ते नाव खरे निघाले. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पिरजादेवर सांगली जिल्ह्यात अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल अशल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्याने सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा वेश धारण करून अशीच लुबाडणुक केल्याची माहिती पुढे येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com