भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदामुळे नागरिकांना त्रास

भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदामुळे नागरिकांना त्रास

मोहोळ : मोहोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शेतकऱ्यांच्या व सर्वसाधारण नागरीकांच्या रोजच्या जिवनाशी निगडीत अशी नऊ पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त असल्याने सर्वसामान्यांच्या कामाची मोठी अडचण निर्माण झाली आहे, या बाबत नागरीकांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मोहोळ तालुक्यातील उजनी कालवा, आष्टी जलाशय, सिना नदी यामुळे बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांचे रोजचे  खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणात होते. तालुक्यात एकशे चार गावांचा समावेश असल्याने खरेदी विक्री व्यवहारासह गावांतर्गत व्यवहार ही मोठ्या प्रमाणात होतात. 

यासाठी मोजणी करणे, नकाशे तयार करणे, नकला तयार करणे, प्रत्यक्षात मोजणी करणे ही कामे कर्मचारी नसल्याने रखडतात, तसेच या कार्यालयात ग्रामिण भागातुन येणाऱ्या शेतकरी व इतरांना आर्थिक भुर्दंडासह मोठया मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते व कामही होत नाही. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचारी व कामासाठी येणारा नागरीक यांच्यात कायम संघर्ष सुरू असतो. या कार्यालयात एकुण चौदा पदे कार्यरत आहेत, त्यापैकी महत्वाची अशी नऊ रिक्त आहेत तर गेल्या वर्षभरापासुन उपअधिक्षक भुमी अभिलेख हे पद रिक्त आहे. तसेच उपलब्ध कर्मचाऱ्याकडे इतर अधिकाऱ्यांचा अतिरीक्त पदभार आहे, त्यामुळे त्यांच्यावर ही ताण येतो. तातडीने रिक्तपदे भरावीत व नागरीकांच्या कामाचा निपटारा वेळेत करावा अशी मागणी नागरी कामधुन होत आहे

आम्ही प्रत्येक महिन्याला रिक्त पदाचा अहवाल वरिष्ठांना सादर करतो, मात्र अद्याप कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. या महिनाअखेर पर्यंत येण्याची शक्यता आहे.
- अमोल भोसले (कार्यालयीन प्रमुख प्रभारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com