खानापूर नगरपंचायत निवडणूकीत तरूणांना कौल

people give chance to youths in Kahnapur Municipal Elections
people give chance to youths in Kahnapur Municipal Elections

खानापूर : येथील नगर पंचायतीसाठी 31 ऑगस्ट ला झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये आठपैकी पाच विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी कौल दिला. तसेच तीन माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली. तर 12 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यात तरूणांची संख्या अधिक आहे. माजी उपनगराध्यक्षा फकिरव्वा गुडलार, उपनगराध्यक्षा ताई सोनटक्के, माजी नगरसेवक विवेक गिरी, माजी नगरसेविका सुनिता मयेकर यांना पराभवाचा धक्का बसला. 20 पैकी बहुतेक प्रभागात अपेक्षित निकाल लागले.

गावडे दांपत्याची हॅटट्रीक 

सिध्दोजी गावडे आणि शोभा गावडे या दांपत्याने विजयाची हॅटट्रीक साधली. प्रभाग क्र. 05 मधून सिध्दोजी गावडे तर प्रभाग 14 मधून शोभा गावडे विजयी झाल्या. प्रभाग 14 मधून सुनिता मयेकर यांचा अवघ्या 4 मतांनी पराभव झाल्याने मयेकर दांपत्याची हॅटट्रीक हुकली. माजी नगराध्यक्ष रफीक खानापुरी आणि मझहर खानापुरी या पिता पुत्रांनी अनुक्रमे 12 आणि 17 या प्रभागातून दणदणीत विजय मिळविला. नारायण मयेकर यांना पाचव्यांदा नगर पंचायतीच्या सभागृहात जाण्याचा मान मिळाला आहे. सकाळी 8.30 वाजता मतमोजणी प्रक्रीयेला सुरूवात झाली. अवघ्या तासाभरात सर्व निकाल बाहेर पडले. विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी येथील सर्वोदय हायस्कूलसमोर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

विजयी उमेदवार
प्रभाग ०१: फातीमाबी अब्दूललतीफ बेपारी
प्रभाग ०२: तोहिद हुसेनसाब चाँदखानावर
प्रभाग ०३: लक्ष्मण अनंत मादार
प्रभाग ०४: लक्ष्मी बसवराज अंकलगी
प्रभाग ०५: सिध्दोजी नारायण गावडे
प्रभाव ०६: मिनाक्षी प्रकाश बैलूरकर
प्रभाग ०७: विनायक सुरेश कलाल
प्रभाग ०८: लता अमृत पाटील
प्रभाग ०९: साहेरा अब्दूलखादीर सनदी
प्रभाग १०: नारायण मल्हारी ओगले
प्रभाग ११: नारायण मारूती मयेकर
प्रभाग १२: रफीकसाब खतालसाब खानापुरी
प्रभाग १३: हणमंत गंगाप्पा पुजारी
प्रभाग १४: शोभा सिध्दोजी गावडे
प्रभाग १५: मेघा शिवानंद कुंदरगी
प्रभाग १६: विनोद दत्तात्रय पाटील
प्रभाग १७: मझहर रफीक खानापुरी
प्रभाग १८: जया गणपती भुतकी
प्रभाग १९: राजश्री गुंडू तोपिनकट्टी
प्रभाग २०: रफीक महमदहुसेन वारीमणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com