संस्कृती बालगुडेनी रसिकांना दिली सांस्कृतिक भक्तीरंगाची मेजवानी

balgude
balgude

अक्कलकोट - अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने ३१ वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तनाच्या आजच्या नववे पुष्पाचा शुभारंभ संस्कृती बालगुडे यांनी भक्तीरंग या बहारदार कार्यक्रमाने गुंफले. 

या कार्यक्रमाचा शुभारंभ जयहिंद शुगरचे चेअरमन बब्रूवाहन माने- देशमुख, व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील, उद्योगपती अरिंजय गांधी, उद्योगपती जिला पेडणेकर (गोवा) यांच्या हस्ते समर्थ प्रतिमा पूजन आणि नंदादीप प्रज्वलीत करून करण्यात आला. यावेळी मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याच कार्यक्रमात तब्बल ८२ व्या वेळी रक्तदान करणारे शासन गुणवंत पुरस्कारप्राप्त शिक्षक अभिजित लोके व सौ. अरूणा लोके यांना समर्थ प्रतिमा व कृपावस्त्र देवून सन्मानित करण्यात आले.

आजच्या सादर झालेल्या बहारदार कार्यक्रमात भक्तीगीते, राष्ट्रभक्ती, भावगीत प्रेमगीत यांच्या मैफिलीत श्रोते तल्लिन झाले.यावेळी अन्नछञ अध्यक्ष जन्मेजय भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शाम मोरे, खजिनदार रवि भंडारे, विश्वस्त डॉ. मनोहर मोरे, अलका भोसले, अनुया फुगे, अर्पिता भोसले,  डॉ. आसावरी पेडगांवकर, सुनीता कुलकर्णी  खोबरे, वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे, गणेश माने-देशमुख, समर्थ माने-देशमुख, नीता माने-देशमुख, सरस्वती माने-देशमुख, अश्विनी निंबाळकर, संयोगिता साळुंखे, मोहिनी राव, अंजली पडवळकर, संजय बडवे, बाळासाहेब देसाई, लाला राठोड. निलकंठ कापसे भाजपा नेते बाळासाहेब मोरे, रोहित खोबरे, प्रविण घाटगे, योगेश पवार, आतिश पवार, नितीन मोरे, आकाश गडकरी, छोटू फडतरे, रोहित निंबाळकर, अक्षय गंगणे, छोटू शिरसाठ, मैनोद्दीन कोरबू, अॅड. संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे, रामचंद्र समाणे, शशिकांत बकरे यांच्यासह हजारो भक्तजन उपस्थित होते. सुत्र संचलन श्वेता हूल्ले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com