esakal | बेळगाव जिल्ह्यात विविध प्रकारच्या 59 भाषेचे लोक
sakal

बोलून बातमी शोधा

Language

बेळगाव जिल्ह्यात विविध प्रकारच्या 59 भाषेचे लोक

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव - मातृभाषा ही महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळेच विविध भागात आपल्याला वेगवेगळ्या भाषेचे लोक दिसून येतात. बेळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या विविध भाषेच्या आणि धर्माच्या लोकांनी आपली मातृभाषा टिकवून ठेवली असून जिल्ह्यात विविध प्रकारच्या 59 भाषेचे लोक राहतात.

दर दहा वर्षांनी करण्यात येणाऱ्या जनगणतीवेळी लोकसंख्येबरोबरच प्रत्येकाच्या भाषेची नोंद केली जाते. बेळगाव जिल्हात कन्नड आणि मराठी या दोन मुख्य भाषेसह देशाच्या विविध भागातून आलेल्या लोकांनी जनजगतीवेळी आपल्या मातृभाषेची नोंद केली आहे. त्यामध्ये मराठी भाषिकांना परिचित नसलेल्या अनेक भाषांचा समावेश असून बेळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने कन्नड मराठी, उर्दू, भाषा बोलणारे लोक अधिक संख्येने आहेत.

हेही वाचा: जोतिबाच्या जागराला डोंगर हाऊस फूल्ल; दिड लाख भाविक

मात्र जिल्ह्याच्या विविध भागात असामी, बंगाली, डोगरी, हिंदी, अवधी, बंजारी ,भोजपुरी, बुंदेली, गढवाली, हरियाणवी, खोरता, कुमाऊनी, लमानी, मारवाडी मेवारी, पहरी, राजस्थानी, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मनिपुरी, नेपाली, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाळी, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू, अडी, अरेबिक, भिल्लोडी, विष्णूपुरीया, कुर्गी, इंग्लिश, खानदेशी, खारिया, खशी, किनोरी, लडाखी, मिझो, पर्शियन, शीना, तिबेटीयन, तुळू आदी मातृभाषेचे लोक कमी जास्त संख्येने राहतात व या सर्व भाषांच्या लोकांनी इतर भाषाही शिकल्या आहेत.

प्रत्येक जण आपल्या मातृभाषेवर प्रेम करत असतो त्यामुळेच जनगणनेच्या वेळी एखादी व्यक्ती कोणत्याही भागात राहत असला तरी आपल्या घरी बोलल्या जाणार्‍या मातृभाषेची नोंद करतो. बेळगाव जिल्ह्यातील विविध उद्योगधंद्यांच्या निमित्ताने आणि व्यवसायानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन राहिले आहेत त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात विविध भाषेचे लोक या ठिकाणी राहत असल्याचे दिसून आले आहे. मराठी भाषिकांनी नेहमीच आपली मातृभाषा टिकावी यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे.

- मालोजी अष्टेकर, माजी महापौर

loading image
go to top