esakal | पुण्या-मुंबईचे लोक आले नि गावच गावकुसाबाहेर गेलं... भितीने राहुट्या करून तेथेच झाले होम क्वॉरंटाईन

बोलून बातमी शोधा

AKOLE TENT

कोरोना आजाराच्या निर्मुलनासाठी सुरु असलेल्या लढाईत बाहेरून आलेल्या लोकांची नोंद ठेवण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले होते.

पुण्या-मुंबईचे लोक आले नि गावच गावकुसाबाहेर गेलं... भितीने राहुट्या करून तेथेच झाले होम क्वॉरंटाईन
sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले - बाहेरील जिल्ह्यातुन विशेषतः पुणे, मुंबई येथून आलेल्यामध्ये आज दिवसभरात जवळपास १२० लोकांनी आपली नोंद सरकारी रूग्णालयात करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. मेहेत्रे यांनी दिली.
कोरोना आजाराच्या निर्मुलनासाठी सुरु असलेल्या लढाईत बाहेरून आलेल्या लोकांची नोंद ठेवण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले होते. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र याठिकाणी नोंद करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुणे,मुंबई व बाहेरील जिल्ह्यातुन येणारे लोकांची नोंद ठेवली जात आहे. 

आज दिवसभरात शहरातील ग्रामीण रूग्णालयात जवळपास १२० लोक बाहेरून आल्याची नोंद करण्यात आली आहे.शहर व तालुक्यातुन पुणे -मुंबई सह शहरी भागात नोकरी व शिक्षणासाठी गेलेले मोठ्या प्रमाणात लोक गावाकडे येत असून त्याची नोंद होऊन त्याची प्राथमिक तपासणी होऊन त्यानी १४ दिवस  घराबाहेर जाऊ नये अशा सुचना दिल्या जात आहे.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे रोगराई नियंत्रित करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी निवास व्यवस्था करणे,अन्न पुरवठा,अतिरिक्त चाचण्या,कपडे,वैयक्तिक संरक्षण, फ्लोअर क्लिनर,सॅनिटायझर, व्हेंटिलेटर,वायू शुद्धीकरण यंत्र,थर्मल स्कॅनरसाठी आयुक्त,नाशिक विभाग यांचेकडे जिल्हा चिकित्सक,
अहमदनगर यांच्या मागणीनुसार 2 कोटी 25 लाखाची अनुदानाची अहमदनगर जिल्ह्यासाठी मागणी केली आहे.

ते सतरा गावात आले नि गावातील सर्वच जण गावाबाहेर असणाऱ्या आपल्या वस्तीवर व टेन्टमध्ये राहायला  गेल्याची घटना चराचीवाडी साम्रद येथे घडली. गावातील आशा सेविका यांनी तालुका आरोग्याधिकारी व प्रशासनाला कळविले आहे .

हे 17 चाकरमानी नुकतेच आपल्या गावी आले. त्यातील  पुणे येथे  इंटरनॅशनल कंपनीत नोकरीला असलेल्या व्यक्तीला ताप, खोकला येत असल्याने त्यास स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्रात जाऊन केंद्रातच राहून नीट झाला.

तो पुन्हा  गावात आला व  मुंबई ,पुणे येथून अधिक 16 लोक आल्याने गावात भीतीचे वातावरण झाले. याबाबत त्या नागरिकांना घरातून बाहेर पडू नका असे सांगतानाच आरोग्याचीही तपासणी करा असे सुचविले. याबाबत प्रशासनालाही सरपंच मारुती बांडे यांनी कळविले.  त्यांची कोणीच दखल न घेतल्याने स्थानिकांनी आपला प्रपंच घेऊन आपले शेत गाठले. तर काहींनी पर्यटकांसाठी असलेले तंबू घेऊन त्या तंबूत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

शेंडी आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी आले त्यांनी त्या रुग्णाला तपासले मात्र त्यांच्या मते त्याचे डोळे आले व ताप आहे. तो कोरोनाग्रस्त नाही तरी देखील ग्रामस्थ त्या रुग्णाला शेंडी येथे तो बरा होईपर्यंत त्याला रुग्णालयात ठेवा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत वरिष्ठाना कळवतो असे म्हणत त्यांनी ग्रामस्थांची  समजूत काढली आहे . मात्र ग्रामस्थ गावात येत नाहीत.

 
डॉ .इंद्रजित  गंभिरे (तालुका आरोग्य अधिकारी ) म्हणतात, साम्रद येथील रुग्णाला तापसण्यासाठी पथक गेले. त्या रुग्णाला होम कॉरोनटाईन ठेवण्यास सांगितले.  याबाबत मी स्वतः जाऊन खात्री करतो. नितीन पाटील (सहायक पोलीस निरीक्षक राजूर ) याबाबत साम्रदवरून फोन आले होते. मी संबंधित आरोग्य अधिकारी यांच्याशी बोललो आहे. तसे असेल तर 108 क्रमाकला फोन करून रुग्णाला हलविता  येईल.

गावात 17 लोक आले असून त्यातील पुणे येथून आलेला रुग्ण तापाने आजारी आहे याबाबत वैधकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे ते आले होते परंतु त्याने कोरोनाचा ताप  नाही असे सांगितले असले तरी तो बारा होईपर्यंत त्याला रुग्णालयात ठेवावे असे  ग्रामस्थ म्हणतात, असे सरपंच चंद्रकला बांडे यांनी सांगितले.