मोहळमध्ये नागरिकांना जुलाब उलट्यांचा त्रास

राजकुमार शहा 
गुरुवार, 21 जून 2018

मोहोळ : मोहोळ शहरासह परिसरातील काही गावातील नागरीकांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला असून गेल्या आठवड्यापासुन मोहोळ येथील ग्रामिण रुग्णालयातून किमान शंभर रुग्ण उपचार घेऊन गेले आहेत. तर काही जण उपचारासाठी दाखल आहेत यामुळे नागरीकात घबराट पसरली आहे.

मोहोळ : मोहोळ शहरासह परिसरातील काही गावातील नागरीकांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला असून गेल्या आठवड्यापासुन मोहोळ येथील ग्रामिण रुग्णालयातून किमान शंभर रुग्ण उपचार घेऊन गेले आहेत. तर काही जण उपचारासाठी दाखल आहेत यामुळे नागरीकात घबराट पसरली आहे.

गेल्या आठवड्यापासुन मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उलट्या व जुलाबांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरवातीला पोटात बारीक कळ निघते नंतर उलट्या व जुलाबास सुरवात होते. त्यामुळे रुग्ण अर्धमेले होत आहेत. त्यामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला तातडीने उपचार देऊन पुढील काळजी घेण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. जे रुग्ण गंभीर आहेत त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. तर इतरावर उपचार करुन घरी पाठविले जाते. सध्या उपचारासाठी पाच ते सहा रुग्ण दाखल असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

महादेव धोत्रे ( रुग्ण भांबेवाडी )

मला अचानक उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला उपचारासाठी मी दाखल झालो आहे. डॉक्टरांनी आज थांबायला सांगीतले आहे.

मोहोळ येथील ग्रामिण रुग्णालयात रंगरंगोटी, दुरुस्ती, रुग्णालय स्वच्छता, नेत्ररुग्ण तपासणी करिता संगणक व एक्सरे डिजीटल यंत्र यासाठी पंचवीस लाख रुपये आमदार फंडातुन वा अन्य निधीतुन मिळावेत अशी लेखी मागणी रुग्णालय प्रशासनाने आमदार रमेश कदम यांच्याकडे केली आहे. तो निधी प्राप्त झाला तर बऱ्यापैकी रुग्णालयाची परिस्थीती सुधारण्यास मदत होणार आहे.

Web Title: People suffer from diarrhea vomiting