ज्यांनी गैरव्यवहार केले असेच लोक सोडून गेले : जयंत पाटील

भारत नागणे
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सात -बारा उतार्यावर ज्यांची नावे होती. ते सगळे आता पक्षासा सोडून पळून जाऊ लागले आहेत.  ज्या-ज्या लोकांनी सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आणि बॅंकांमध्ये घोटोळे केले आहेत,  असे लोक चौकशीच्या भितीपोटी सेना-भाजपाच्या कळपात दाखल होऊ लागली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे, अशी घणाघती टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले.

पंढरपूर  : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सात -बारा उतार्यावर ज्यांची नावे होती. ते सगळे आता पक्षासा सोडून पळून जाऊ लागले आहेत.  ज्या-ज्या लोकांनी सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आणि बॅंकांमध्ये घोटोळे केले आहेत,  असे लोक चौकशीच्या भितीपोटी सेना-भाजपाच्या कळपात दाखल होऊ लागली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे, अशी घणाघती टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले.

मंगळवारी (ता.27) रात्री उशिरा शिवस्वराज्य यात्रा पंढरपुरात दाखल झाली. यावेळी यात्रेचं मोठ्या उत्साहाने स्वागत केले. त्यानंतर येथील शिवतिर्थावर झालेल्या जाहीर सभेत पाटील यांनी पक्ष सोडून जाणार्या आमदार आणि नेत्यांचा नामोल्लेख टाळून चांगलाच समाचार घेतला.

यावेळी पाटील म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठं केलं. अडचणीच्या काळात   मदत केली. असेच लोक आता पक्षाला सोडून पळून जाऊ लागले आहेत. जे पक्ष सोडून चालले आहेत, अशा काही  मंडळींनी साखर कारखान्यामध्ये घोटोळे केले आहेत. तर कुणी शेतकर्यांचे पैसे दिले नाहीत म्हणून तर काही जण ईडीच्या भितीने पक्ष सोडून चालले आहेत.

कोणाच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट नवीन होतकरु कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही निवडणुकीच्या तोंडावर वर्षाबंगल्यावर पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे. साम,दाम,दंड भेद नितीचा वापर करुन भल्याभल्यांना त्यांनी वर्षा बंगल्यावर जाण्याची वेळ आणली असी टीकीही पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

कर्जमाफी केली नाही तर सत्तेला लाथ मारु म्हणणारे उद्वध ठाकरे गेल्या पाच वर्षापासून गुळाला मुगळा कसा चिकटून बसतो तसं ते सत्तेला चिकटून बसले आहेत. खिशात राजीमाना घेवून फिरणार्या मंत्र्यांचे राजीनामे आता याच चंद्रभागेच्या नदीत बुडवण्याची वेळ आली आहे,अशी टीका ही  राष्ट्रवादीचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे राजूबापू पाटील, अमोल मेटकरी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, शहर अध्यक्ष संदीप मांडवे,  सुधीर भोसले, दीपक पवार आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The people who have been scammed are left out says jayant patil