दहशतवादाचा खात्मा ही साऱ्यांचीच जबाबदारी! 

terrorist
terrorist

सोलापूर : दहशतवाद ही संपूर्ण जगाची समस्या बनली आहे. दहशतावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा तर कायमच सज्ज आहे. आपला देश, राज्य आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी दक्ष असणे आवश्‍यक आहे. 

सिमीसह अन्य दहशतवादी कारवायांशी संबंधित हालचाली यापूर्वी सोलापुरात दिसून आल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या माध्यमातून सातत्याने संशयियिंच्या चौकशा सुरू आहेत. सोबतच बॉम्ब शोधक व नाशक पथक, सुरक्षा शाखेच्या वतीने महत्त्वाच्या ठिकाणांची सातत्याने तपासणी केली जाते. रेल्वे स्थानक, बसस्थानक, चित्रपटगृह, सिद्धेश्‍वर मंदिर, बीएसएनएल कार्यालय, जलशुद्धीकरण केंद्र यासह अन्य ठिकाणी पोलिसांचा कायमचा वॉच आहे. 

शहर, राज्य आणि देशपातळीवरील पोलिस यंत्रणा दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कार्यरत आहे. गुप्तचर यंत्रणाही सर्वप्रकारची माहिती जमवून सुरक्षेसाठी कार्यरत आहे. मोठ्या शहरांत घर भाड्याने देताना पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. भाड्याने राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचे मूळ गाव कोणते, कामाला कोठे आहे, परराज्यातील असेल तर इथे कशासाठी आला याची चौकशी घर मालकाने करावी. शहर पोलिस दलाच्या वतीने लघुपटांच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. 

आपली जबाबदारी.. 
- घर भाड्याने देताना संबंधित व्यक्तीची चौकशी करावी. 
- घर, कार्यालयाजवळ संशयित व्यक्तीचा वावर असेल तर पोलिसांना कळवा. 
- कोठेही बॅग अथवा अन्य संशयित वस्तू असेल तर हात लावू नका. 
- तरुणांना कट्टरतेपासून दूर ठेवा. 

जागतिक स्तरावर दहशतवादाच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. दहशतवाद हा गल्लीपासून सुरू होणारा विषय आहे. अनेकदा दहशतवादा हा विषय फक्त सरकार आणि सुरक्षा यंत्रणांशी संबंधित आहे असे समजून दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील पोलिस आहे हे विसरू नये. दैनंदिन काम करताना कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू, व्यक्ती, हालचाल दिसून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. सायबर दहशतवादही वाढत आहे. तरुणांना आर्थिक मदत करून ऑनलाइनच्या माध्यमातून जाळ्यात ओढले जातेय. सर्वांनी विशेषत: पालकांनीही दक्ष असावे. आपली मुले चुकीच्या मार्गाने जात नाही ना हे पाहावे. अधिक माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षातील 100 किंवा 0217-2744600 या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. 
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com