चायनीज आकाश कंदिलांकडे नागरिकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

राशिवडे बुद्रुक - ग्रामीण भागातील जनतेने आणि व्यापाऱ्यांनीही चायनीज दिवाळी कंदिलांना बायबाय केल्याचे दिसत आहे. चायनीज आकाश कंदील यंदा कमी झाल्याचे दिसत आहे. ग्राहकांनीही त्या मालाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावरून चायनीज व परदेशी माल न घेता केवळ स्वदेशी मालच घेण्याचे आवाहन केले जात आहे. यामुळे चायनीज माल आणला आणि खपलाच नाही, तर तोटा नको म्हणून व्यापाऱ्यांनीही त्याकडे पाठ फिरवली आहे. यंदा स्वदेशी बनावटीचे आकाश कंदील आले आहेत. त्यांच्या रंगीबेरंगी व विविध आकारांनी बाजारपेठा सजल्या आहेत. त्यांच्या दराचा विचार न करता चायनीज घ्यायचे नाही, ही भूमिका ग्राहकांतूनही दिसत आहे. लोकांमध्ये परदेशी माल न घेण्याचे संदेश येऊ लागल्याने आम्हीही स्वदेशी मालच घेतला, असे भोगावती येथील व्यापारी सुहास पाटील यांनी सांगितले.

Web Title: Peoples not inerested in Chinese Skylamp