निवडणुकीच्या रणांगणावरील कायमच्या योध्दा " नागमणी "

विजयकुमार सोनवणे 
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

सोलापूर : महापालिका असो वा विधानसभा इतकेच नव्हे तर लोकसभा.... यापैकी कोणतीही निवडणूक जाहीर झाली की सोलापूर शहरातील एक चेहरा नेहमी चर्चेत येतो...नागमणी जक्कन हे नाव.

आतापर्यंत लढलेल्या आठ ते दहा निवडणुकांमध्ये त्यांच्या पदरी अपयशच आले. मात्र "बचेंगे तो और भी लडेंगे...' या अविर्भावात त्यांनी यंदाही सोलापूर शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी केली असून, या दोन्ही मतदारसंघात "चुडियॉं' (त्यांचे चिन्ह ः बांगडी) निश्‍चित खणकणार असा दावा त्यांनी केला. 

गेल्या 15 वर्षांत अनेक दिग्गजांच्या विरोधात निवडणूका लढविल्याने त्या नेहमीच चर्चेत राहिल्या. विशेषतः 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर त्या आणखीनच चर्चेत आल्या. त्याला कारणही तसेच होते. तत्कालीन मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली. योगायोगाने सौ. शिंदे यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव झाला आणि जक्कन यांना साडेआठ हजार मते मिळाली. अपक्ष उमेदवारांच्या माघारीची जबाबदारी असलेल्या "ज्येष्ठां'नी जक्कन यांच्या उमेदवारीची तितकीशी दखल घेतली नाही. मात्र निकालानंतर त्याचे परिणाम दिसून आले.

जक्कन यांची उमेदवारीकडे जक्कन यांना मिळालेले मताधिक्‍क्‍य हे पूर्व भागाच्या परिसरातील होते. त्यामुळे जक्कन यांच्या उमेदवारीला "कोठून' पाठिंबा मिळाला यावर बराच खल झाला. मात्र काही कालावधीनंतर हे प्रकरण सर्वजण विसरून गेले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पुन्हा आपली उमेदवारी दाखल केली, माढा लोकसभा मतदारसंघातून, तीही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात. त्या ठिकाणीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीतही त्यांनी नसीब अजमावले, मात्र अपयशच पदरी आले. आताही त्यांनी दोन मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे. जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत लोकसभा, विधानसभा वा महापालिकेची निवडणूक असो, प्रत्येक निवडणूक लढविणारच, असे त्यांचा संकल्प आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permanent warrior "Nagmani" on election battlefield