आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी

राजकुमार शहा
गुरुवार, 21 जून 2018

मोहोळ (सोलापूर) : गेल्या  अनेक वर्षापासुन कोट्यावधी रुपये खर्च करून अर्धवट असलेल्या मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसासिंचन योजनेचा टप्पा क्र. 2 च्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्ववाखाली मोहोळ तालुुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी शेतकरी शिष्टमंडळासह राज्याचेेे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले असुन या बाबत गिरीश महाजन यांनी हा प्रश्न तातडीने माार्गी लावुन या कामाच्या शुभारंभालाच मी येणार असे अश्वासन दिले असल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.

मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजना गेल्या 25 वर्षापासुन अर्धवट आहे. गेल्या 2 वर्षापुर्वी टप्पा क्र. 1 चे काम पूर्ण होऊन थोडा का होईना सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. या उपसासिंचन योजनेचा दुसरा टप्पा क्र. दोन मधे आष्टी उपसा सिंचन योजनेतुन पंपगृहाद्वारे पोखरापूर तलावावात पाणी सोडण्याचे काम अद्याप रेंगाळले आहे. या माध्यमातुन सुमारे 1500 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. 

या कामाच्या विद्युत पंपगृहास स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. पुढील  स्थापत्य यांत्रिकी कामाकरिता अंदाजे 20 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. या प्रकल्पाचा सुधारित प्रशासकीय अहवाल शासनाकडे सादर केला आहे. तरी त्यास मान्यता मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे काळे यांनी केली आहे.

याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नाबाबत संबंधित विभागाची बैठक लावून या कामासाठी नव्याने मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देऊन या कामाच्या शुभारंभा साठी मी स्वतः येणार आहे असे आश्वासन दिले आहे. यावेळी काळे यांच्यासह रामदास झेंडगे, अमोल कुर्डे, अजय गावडे, विष्णू मेलगे समाधान काळे अतुल भोसले आदी उपस्थित होते. .
 
Web Title: permission for aashti upasa sinchan scheme