शेतकऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी

नागेश गायकवाड
रविवार, 2 डिसेंबर 2018

आटपाडी  : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी संपूर्ण क्रांती मोर्चाने आझाद मैदानावर पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देऊन परवानगी नाकारले आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी न्यायालयात रिट दाखल केली आहे. त्याची सुनावणी उद्या सोमवारी होणार आहे.
 

आटपाडी  : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी संपूर्ण क्रांती मोर्चाने आझाद मैदानावर पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देऊन परवानगी नाकारले आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी न्यायालयात रिट दाखल केली आहे. त्याची सुनावणी उद्या (सोमवारी) होणार आहे.

संपूर्ण क्रांती मोर्चाच्या अध्यक्ष आणि आटपाडीच्या सुकन्या कल्पना इनामदार यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आझाद मैदानावर सोमवार पासून बेमुदत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनासाठी स्थानिक पोलिस ठाण्याकडे 14 नोव्हेंबरला परवानगी मागितली होती. त्यानंतर दहा दिवसांनी पोलिसांनी आंदोलन करण्यास परवानगी दिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इनामदार यांनी जत, कवठेमंकाळ, तासगाव, आटपाडी, मिरज, पलूस आणि कडेगाव तालुक्यात जनजागृतीपर कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. शेतकऱ्यांच्यात जनजागृती केली होती.

मुंबईचे आझाद मैदानावरील आंदोलन मोठे करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत वाखारे यांनी कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित करून आंदोलनास काल परवानगी नाकारली. तसे लेखी पत्र श्रीमती इनामदार यांना दिले आहे. त्यामुळे उद्याचे आंदोलन रद्द झाले आहे. आंदोलनाच्या परवानगीसाठी श्रीमती इनामदार यांनी उच्च न्यायालयात रिट दाखल केली आहे. त्याची सुनावणी उद्या सोमवारी होणार आहे.              

''संपूर्ण क्रांती मोर्चाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शांततेत आंदोलन होणार होते. असे असताना सरकार पोलिसांच्या आडून परवानगी नाकारून आंदोलन दाबत आहे.आमच्या हक्कावर गदा आणली आहे.''
- कल्पना इनामदार

Web Title: Permission denied by the police Farmers indefinite dharna movement