'अमोल देसाई यांच्या कारभाराविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मत्स्य व्यवसाय संघाचे अध्यक्ष अमोल देसाई यांच्या कारभाराच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच एनसीडीसीकडील 17 लाख रुपयांच्या कर्जाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी उच्च न्यायालयात करणार असल्याचे पत्रक अखिल भारतीय भोई समाज सेवा संघाचे सरचिटणीस प्रा. एकनाथ काटकर यांनी प्रसिद्धीस दिले.

पत्रकात म्हटले आहे, की देसाई यांनी माझ्या विरोधात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे वाचनात आले. माझी पत्नी मीनाक्षी यांनी त्यांच्या खोट्या सह्या करून श्री. देसाई यांनी फसविल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात केली आहे. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत चौकशी अधिकारी नेमून गुन्हा दाखल करतीलच. तरीही सविस्तर माहितीसह येथील न्यायालयातसुद्धा दाद मागणार आहे. तसेच एनसीडीसीकडून घेतलेल्या आणि थकीत कर्जाचीही चौकशी करण्याची मागणी उच्च न्यायालयात करणार आहे. पाच वर्षांपूर्वी संघाच्या व्यवस्थापनाने मला, जयवंत शिर्के यांना सल्लागार म्हणून नेमले होते. तेव्हाही मी संघाच्या सभेत एकदाच उपस्थित होतो. व्यवस्थापक म्हणून सुधाकर शिर्के होते; परंतु तीन वर्षांपूर्वी त्यांनी संघाची जबाबदारी देसाई यांच्याकडे दिली आहे. कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे सौ. काटकर यांच्या खोट्या सह्या दुसऱ्यांनी केल्याची बाब खरी नाही.

Web Title: Petition against Amol Desai's work in high court