पिटिशन रायटर लाचप्रकरणी जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सातारा - कोर्ट माझ्या ओळखीचे आहे, कोर्टाला सांगून तुमच्या केसचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यास सांगतो व तुमचे हेलपाटे वाचवितो, अशी फुशारकी मारणाऱ्या पिटिशन रायटरला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पकडले. 

दत्तात्रय हरिशचंद्र भांबुरे (वय 56, रा. शनिवार पेठ, सातारा) असे या पिटिशन रायटरचे नाव आहे. जिल्हा न्यायालयात तो दुसऱ्या मजल्यावर अर्ज लिहून देण्याचे काम करतो. तक्रारदाराचा स्थावर मालमत्तेसंबंधी दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामध्ये तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी भांबुरे याने एक लाख रुपयाची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर लाचेच्या मागणीपैकी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भांबुरेला अटक केली. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये टायपिंग हॉलमध्ये हा सापळा लावण्यात आला होता. त्याच्या विरोधात शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे व त्यांच्या सहकाऱ्यांची ही कारवाई यशस्वी केली. 

Web Title: Petition Reuters found bribery case