बेळगाव : पेट्रोल १०१.७१, डिझेल ८७.७१ रुपये लिटर

बेळगावात सर्वसामान्य, वाहनमालकांना दिलासा; पंपमालकांना क्रेिडट बंद
Fuel
FuelSakal

बेळगाव - पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने इंधनाच्या दरात मोठी कपात झाली आहे. यामुळे बेळगावात आज पेट्रोल १०१.७१, तर डिझेल ८७.७१ रुपये झाले आहे. याचा दिलासा सर्वसामान्यांना मिळाला असला, तरी पेट्रोलपंपमालकांना मोठा फटका बसला आहे. अवघ्या सहा महिन्यांत दोन वेळा इंधनाच्या दरात मोठी कपात केल्याने पाच हजार लिटर इंधनाची क्षमता असलेल्या पेट्रोलपंपमालकांना सरासरी १० लाखांचा फटका सहन करावा लागला आहे.

कोरोनानंतर पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. जुलै २०२१ मध्ये पेट्रोल १०३.०९ डिझेल ८८.९७ रुपये होते. त्यानंतर दिवाळीपर्यंत ११५ रुपयांपर्यंत पेट्रोल व डिझेलनेही शंभरी पार केली होती. त्यानंतर केद्राने व राज्याने एकदाच कर कमी केल्यामुळे पुन्हा पेट्रोल शंभरच्या घरात व डिझेल ८० च्या घरात आले होते. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपूर्वी सतत १५ दिवस पेट्रोल व डिझेलची वाढ करण्यात आली. यामुळे पेट्रोल ११०.८६ तर डिझेल ९४.६१ रुपयांवर स्थिर होते. आता पुन्हा उत्पादन शुल्क कमी केल्याने या दरात पुन्हा घट झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी केंद्र व राज्य सरकारने कर कमी केल्यामुळे या इंधनाच्या दरात मोठी घट झाली होती. यामुळे सरासरी पाच हजार लिटर साठवणुकीची क्षमता असलेल्या पंपचालकांना एकदम पाच लाखापर्यंत फटका बसला होता. पुन्हा केंद्राने दर कमी केल्यामुळे त्यांना पुन्हा फटका बसला आहे. यापूर्वी पेट्रोलपंपमालकांना संबंधित ऑईल कंपनीकडून पाच दिवसांच्या क्रेडिटवर इंधन दिले जात होते. मात्र, एप्रिलपासून ही क्रेडिट सिस्टिम बंद करण्यात आले आहे. यामुळे इंधन खरेदी करताना पैसे भरूनच घ्यावे लागत आहे. याचा फटकाही प्रत्येक वितरकाला बसत आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेले पेट्रोलपंपमालक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल दर अधिक आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यासह परिसरातील वाहनचालक कर्नाटकात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणे पसंत करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com