#KolhapurFloods महामार्गावर वाहतूक अद्याप सुरू नाही ,पण टँकर सोडलेत धोका पत्करून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - महापुरामुळे शहरात पेट्रोल व डिझेलची टंचाई झाली आहे. यावर मात करण्यासाठी पुरातून धोकादायक स्थितीतही टँकर शहरात आणले जात आहेत, अशी माहिती पेट्रोल डिझेल संघटनेचे अध्यक्ष माणगावे यांनी दिली. 

कोल्हापूर - महापुरामुळे शहरात पेट्रोल व डिझेलची टंचाई झाली आहे. यावर मात करण्यासाठी पुरातून धोकादायक स्थितीतही टँकर शहरात आणले जात आहेत, अशी माहिती पेट्रोल डिझेल संघटनेचे अध्यक्ष माणगावे यांनी दिली. 

सर्व प्रथम प्रशासनासाठी दोन टँकर आज सायंकाळी कोल्हापुरात आणले. त्यानंतर आता अठरा टँकर शहरात सोडण्यात येणार आहेत. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथे महापूराचे पाणी अद्यापही तीन फुट आहे. पण शहराची गरज विचारात घेऊन ही वाहतूक करण्यात येत आहे. सुरक्षेसाठी पोकलॅन्डही पुरामध्ये ठेवण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन बोट व आर्मीच्या वाहनातून सिलेंडर गॅस टाक्या नेण्यात येत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Diesel tanker send through flood water on own risk