‘चेतना’वर पहिले पेट्रोल पंप ‘एटीएम’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

सांगली - जिल्ह्यातील पहिले पेट्रोल पंप एटीएम सेंटर आज दुपारी बारा वाजता सुरू झाले. भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्या येथील शंभर फुटी रस्त्यावरील चेतना पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी या सुविधा केंद्राचे उद्‌घाटन केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. संचालक श्रीरंग केळकर यांनी स्वागत केले. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात बॅंका आणि एटीएम केंद्रासमोर मोठमोठ्या रांगा लागल्या. लोकांचे हाल झाले. काही लोकांचा मृत्यू झाला. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोल पंपांसह स्वाईप मशीन असलेल्या दुकानांत एटीएम कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपये रोख घेता येतील, अशी घोषणा केली. परंतु हे सक्तीचे राहिले नाही. अनेक दुकानांत व्यवहार ठप्प असल्याने चालणारे चलनच नव्हते. त्यांनी पैसे द्यायचे कुठून? त्यामुळे जिल्ह्यात ही सुविधा सुरू नव्हतीच. आज पहिले पेट्रोल पंप एटीएम सेंटर सुरू करण्यात आल्याने लोकांना कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपये रोख घेता येणार आहेत. पहिल्या तासाभरात लोकांनी पंचवीस हजाराहून अधिक रोकड घेतली.

शंभर, पन्नास घ्या
बॅंक एटीएममधून पैसे काढले तर २००० रुपयांची नोट मिळते, ती सुट्टी कुठे करायची, हा प्रश्‍न पडतो. चेतना पंप केंद्रावर मात्र शंभर, पन्नासच्या नोटा मिळतात, त्यांना स्टेट बॅंकेकडून चलनही उपलब्ध होणार आहे. 

५ रुपये कमिशन
पेट्रोल पंप एटीएम केंद्रावरून पैसे काढण्यासाठी काही खर्च होईल का? असा सामान्य ग्राहकांचा हमखास प्रश्‍न आहे. परंतु त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे केंद्र चालवणाऱ्या पेट्रोल पंप मालकांना प्रति उलाढाल (ट्रान्झॅक्‍शन) ५ रुपये कमिशन मिळणार आहे.

Web Title: petrol pump atm