इस्लामपुरात पेट्रोल पंप बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

निम्म्यापेक्षा जास्त वाळवा तालुका पुराच्या छायेत असताना इस्लामपूर शहरातील पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. तालुक्याची यंत्रणा संपूर्ण इस्लामपूर शहरातून हाताळली जात असताना आता पेट्रोल मिळणे बंद झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.

इस्लामपूर : निम्म्यापेक्षा जास्त वाळवा तालुका पुराच्या छायेत असताना इस्लामपूर शहरातील पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. तालुक्याची यंत्रणा संपूर्ण इस्लामपूर शहरातून हाताळली जात असताना आता पेट्रोल मिळणे बंद झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. सकाळी फक्त लिटरपुरते मर्यादित पेट्रोल मिळत होते, परंतु आता तेलच देणे बंद केले आहे.

वाळवा तालुक्यात सुमारे पन्नासहून अधिक गावे महापुराने बाधित झाली आहेत. या गावातील लोकांना सध्या इस्लामपूर शहरातून मदतीचा ओघ सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांनी आपली मदतीची यंत्रणा उभी केली आहे.

शहरात बाहेरून येणाऱ्या यंत्रणेवर देखील मर्यादा आल्याने डिझेल, पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. तूर्तास आज सकाळी फक्त एक लिटर इतकेच पेट्रोल ग्राहकांना दिले जात होते. ११ वाजल्यापासून तेही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Pumps in Islampur are closed because of flood