सेसमुळेच पेट्रोलचा भडका

सुनील पाटील
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दहा-वीस पैसे म्हणत आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला. आज प्रतिलिटर पेट्रोल ८६ रुपयांपर्यंत व डिझेल ७४ रुपये ८५ पैशांनी विक्री झाले. दरम्यान, पेट्रोलवर प्रतिलिटर आकारला जाणारा ९ रुपये सेसच पेट्रोल भडका उडविण्यास कारणीभूत ठरले आहे. हा सेस कमी केल्यास दर कमी होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, अठ्ठावीस दिवसात प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८३.९५ रुपयांवरून ८६ रुपयांपर्यंत, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ७१.१५ रुपयावरून ७३ रुपयांपर्यंत वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार इंधनाचे दर ठरत आहेत. यात रोज प्रतिलिटरमागे १० ते २० पैसे दरवाढ होते.  

ग्राहकांना दहा-वीस पैशात होणारी दरवाढ दिसून येत नाही, मात्र ऑगस्टमध्ये अठ्ठावीस दिवसांत प्रतिलिटर पेट्रोलमागे २ रुपये तर डिझेल दरात अडीच रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. देशात राज्यात सर्वाधिक कर पेट्रोलवर आहे. 
सेसवरील २ ते ३ रुपये कमी झाल्यास दर कमी होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात दररोज 
सुमारे दोन लाखांहून अधिक लाख लिटर पेट्रोल विक्री होते. प्रत्येक लिटरवर दोन ते तीन रुपये द्यावे लागतात. इंधन दरवाढी थेट परिणाम महागाईवर 
होत आहे.

सरकारने प्रतिलिटर पेट्रोलवर आकारला जाणारा ९ रुपये सेस कमी करावा, यासाठी पेट्रोल-डिझेल मालक-चालक प्रयत्न करत आहेत. सरकारने सेस कमी केला नाही. सेस कमी करूनच पेट्रोल दर कमी करता येतील.
- गिजकुमार माणगावे, अध्यक्ष पेट्रोल-डिझेल असो

पूर्वी चार ते पाच महिन्यांतून एखादा रुपया दर वाढला तरी पेट्रोल भडकले असे वाटायचे. आता तर दररोज पेट्रोल-डिझेल दर वाढत आहे. दरवाढ कमी करण्यासाठी शासनाची इच्छाशक्तीच नाही.
- दादासाहेब पाटील, ग्राहक

पेट्रोल- डिझेल दरवाढीमुळे महाविद्यालयात दुचाकी घेऊन जाण्यासाठी पालक मज्जाव करत आहेत. इंधन दरवाढ कमी व्हावी, यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत.
- मृणाल केसरे, विद्यार्थिनी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol Rate Increase by Ses