फलटणच्या राजकारणात राजघराण्याची नवी पिढी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

फलटण - फलटणमधील राजघराणे असलेल्या नाईक निंबाळकर कुटुंबातील नवी पिढी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात प्रवेशकर्ती झाली आहे. 

पालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा मुलगा विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने वाठार निंबाळकर गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच राजघराण्यातील पुढील पिढीही राजकारणात येण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते. 

फलटणसह तालुक्‍याच्या राजकारणात गेल्या २५ वर्षांपासून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच त्यांच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषद सदस्या आहेतच. ता. २१ रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी संजीवराजे यांनी तरडगाव गटातून, तर सौ. शिवांजलीराजे यांनी साखरवाडी गटातून राष्ट्रवादीतर्फे आपली उमेदवारी दाखल केली आहे. २००६ ते २०११ या कालावधीत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे हे फलटण पालिकेचे सदस्य होते. सद्यःस्थितीत नगरसेवक रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे  गेली २० वर्षे पालिकेच्या राजकारणात कार्यरत आहेत. त्यांनी पाच वर्षे नगराध्यक्ष म्हणूनही कारभार सांभाळला आहे. 

फलटण संस्थानचे प्रतापसिंह ऊर्फ बापूसाहेब नाईक निंबाळकर यांच्या कन्या श्रीमती सुभद्राराजे नाईक निंबाळकर या देखील शहराच्या राजकारणात पालिकेच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. एकूणच राजघराण्यातील ज्येष्ठ व्यक्‍तींच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीद्वारे विश्‍वजितराजे यांचाही  राजकारणात प्रवेश होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Phaltan new generation in politics