पीएच.डी.साठी इंग्रजी सुपरफास्ट!

संदीप खांडेकर
शुक्रवार, 6 जुलै 2018

कोल्हापूर - यंदा शिवाजी विद्यापीठात इंग्रजी विषयाला पीएच.डी.करिता सर्वाधिक ७८, तर एम. फिल.साठी ३७ जागा उपलब्ध आहेत. कमी जागांमुळे ज्यांना प्रवेशाला कोलदांडा मिळाला होता, त्यांना यंदा प्रवेशाचा मार्ग सूकर होणार आहे. नव्या मार्गदर्शकांचा आकडा वाढल्याने पीएच.डी.करिता एकूण ८९९, तर एम. फिल.साठी २८३ जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. 

गतवर्षी पीएच.डी.ला ७०१, तर एम. फिल.साठी ११८ जागा उपलब्ध होत्या. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांची संख्या लक्षात घेता जागा वाढविण्यावर मर्यादा होत्या. विद्यापीठ प्रशासनाने त्यावर तोडगा काढत नव्या मार्गदर्शकांचे प्रस्ताव मागितले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आणि विविध विषयांच्या जागांचा आकडाही वाढला. एम. फिल.साठी जर्नालिझम, मॅथेमॅटिक्‍स, तर पीएच.डी.साठी फूड सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी, एन्व्हार्मेंटल सायन्स अँड इंजिनियरींग व फूड टेक्‍नॉलॉजी इंजिनियरींग प्रत्येकी एक जागा उपलब्ध असली, तरी अन्य अभ्यासक्रमांचा आकडा त्याहून अधिक आहे. विशेष म्हणजे अर्धमागधीकरिता दोन, तर रशियनकरिता पीएच.डी.च्या जागा उपलब्ध आहेत. 

इंग्रजीकरिता पीएच.डी. व एम. फिल.करिता सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी या विषयाकरिता पीएच.डी.साठी ३३ जागा होत्या. मात्र, प्रवेश परीक्षेत केवळ सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पीएच.डी. व एम. फिल.साठी एकच प्रवेश परीक्षा असल्याने ज्यांना ४० गुण मिळाल्याने, त्यांनी थेट पीएच.डी.साठीच प्रवेश घेतला. त्यामुळे एम. फिल.साठी २८३ जागा असल्या तरी एम. फिल.साठी किती विद्यार्थी प्रवेश घेणार, असा प्रश्‍न पुन्हा निर्माण होणार आहे. 

सर्वाधिक जागा असणारे अनुक्रमे विषय असे  
 एम. फिल - इंग्रजी - ३७, मराठी - २७, केमिस्ट्री - २३, हिंदी - २२, शिक्षणशास्त्र - १९ 
 पीएच.डी  - इंग्रजी - ७८, केमिस्ट्री - ७४, मराठी - ५७, फिजिक्‍स - ५२, मेकॅनिकल इंजिनियरींग - ४३

Web Title: Ph.d. English education shivaji university