छायाचित्रकारांचे "मिशन संघटन'! लॉकडाउनने केली एकजूट

Photographers' "Mission Organization
Photographers' "Mission Organization

नगर ः ""लॉकडाउनमुळे संपूर्ण देशातील बहुतांश व्यवसाय बंद पडले आहेत. त्याचाच फटका छायाचित्रकारांनाही बसत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील छायाचित्रकारांच्या सक्षमीकरणासाठी "अहमदनगर फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर नोंदणी अभियान' सुरू करण्यात आले आहे.

"मिशन संघटन' या अस्तित्वाच्या लढाईतून छायाचित्रकार एकाच छताखाली येत आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर छायाचित्रकारांचा व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करून तीन हजार जणांची नोंदणीही करण्यात आली आहे,'' अशी माहिती छायाचित्रकार संदीप पाटील यांनी दिली. 

सर्व क्षेत्रांतील व्यावसायिक एकजुटीने संघटित आहेत. मात्र, जिल्ह्यातील छायाचित्रकारांची कुठेही नोंद नाही. संकटकाळात असलेल्या छायाचित्रकारांना सरकारने मदत करावी, यासाठी भविष्यात अस्तित्व दाखवता येण्यासाठी संघटन मजबूत असणे गरजेचे आहे. राज्यभरात छायाचित्रकारांचे मिशन संघटन सुरू झाले आहे. जिल्ह्यात छायाचित्रकारांची संख्या साधारणतः दहा हजार आहे.

या अभियानासाठी गणेश लोणे, सुरेश भुसा, समीर मणियार, अतुल कचरे, अनिकेत ससे, दिगंबर कुटे, बंटी सोनवणे, अभिजित उदारे, तसेच प्रत्येक तालुक्‍यातील संघटनांचे पदाधिकारी मदत करत आहेत. व्हॉट्‌सऍप ग्रुपमध्ये फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, फोटो, व्हिडिओ एडिटर, फोटोफ्रेम मेकर यांचा समावेश आहे. जास्तीत-जास्त साधारणतः दहा हजार छायाचित्रकारांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. 

संघटनेचे फायदे 
- शासनदरबारी नोंद झाल्यास मानधनास पात्र 
- शासकीय कर्ज योजनेचा फायदा 
- आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून कुटुंबाचा विकास 
- बचतगटाची स्थापना करून कमी व्याजदरात उद्योगासाठी निधी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com