शिराळा तालुक्यात बिबट्याच्या पिल्लाचा वावर

शिराळा तालुक्यात बिबट्याच्या पिल्लाचा वावर

शिराळा - अंत्री खुर्द ( ता.शिराळा) येथे चौगुले वस्ती जवळील बामन मळा परिसरातील शेताच्या बांधावरील निलगिरीच्या झाडावर एक वर्षे वयाचे बिबट्याचे पिल्लू दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण  झाले आहे. वनविभागाने त्यास हुसकावून लावले असून कर्मचारी त्या परिसरात तळ ठोकून आहेत.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सकाळी येथील शेतकरी शेतात गेले असता त्यांना निलगिरीच्या झाडावर बिबट्याचे  पिल्लू आढळून आले. गावातील लोकांनी वन विभागाला संपर्क केला आहे. शेतकऱ्यांनी आपली कामे जागेवरच थांबवून जनावरे शेतातून गावातील गोठ्यात आणली आहेत.

वनविभागाचे वनरक्षक प्रकाश पाटील,सचिन पाटील व कर्मचारी संपत देसाई, मारुती पाटील, संजय पाटणकर,संतोष कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. लोकांची गर्दी असल्याने बिबट्यास हुसकवणे अवघड झाले होते. लोकांना इतरत्र बाजूला सारुन त्यास मोकळी वाट करून दिल्यानंतर त्याने धूम ठोकली.

यापूर्वी  वाकुर्डे खुर्द व बुद्रुक येथे झाडावर बिबट्या बसलेला आढळून आला होता. अनेक ठिकाणी बिबट्यांनी जनावरे व पाळीव प्राण्यांना आपले भक्ष्य बनवले आहे. काल बुधवारी रात्री संजय चौगुले यांच्या दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्या आहेत.

झाडावर बिबट्या असल्याने त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे बिबट्याने भीती पोटी कोणावर हल्ला करू नये याची खबरदारी आम्ही घेत होतो. गर्दीमुळे तो झाडावरून लवकर उतरत नव्हता. त्यामुळे आमच्यावर मानसिक तणाव होता. काही वेळाने लोकांची गर्दी कमी केल्याने त्यास तिथून हुसकावून लावता आले. बिबट्याच्या ठिकाणी गर्दी न केल्यास त्यास हुसकवणे सोपे होते. त्यामुळे अशावेळी लोकांनी गर्दी टाळावी.
- सचिन पाटील,  
वनरक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com