थेट पाइपलाइनचा विषय गाजणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - महापालिकेची आज (ता. २५) होणारी सर्वसाधारण सभा थेट पाइपलाइनच्या विषयावरून गाजण्याची शक्‍यता आहे. मागील सभेत या विषयावर सदस्यांना चर्चा करायची होती; पण आयुक्त पी. शिवशंकर हे उपस्थित नसल्याने सदस्यांनी सभा तहकूब केली होती. ही सभा उद्या होत आहे.  दरम्यान, या सभेत महापौर अश्‍विनी रामाणे आणि उपमहापौर शमा मुल्ला या राजीनामा देतील, अशी दाट शक्‍यता आहे. त्यानंतर नव्या महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे. अलीकडच्या काळात तर हा संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह सर्व प्रशासनाला प्रत्येक सभेत लक्ष्य केले जात आहे. याला उद्याची सभाही अपवाद असणार नाही. थेट पाइपलाइनचा विषय यासाठी निमित्त ठरणार आहे. थेट पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. फुटकी पाइप घातल्याचा प्रकारही उघडकीस आला होता. त्यामुळे थेट पाइपलाइनवरून ही सभा गाजणार असे चित्र आहे.

राजीनाम्याकडे लक्ष
गतवर्षी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसे हे एकत्र आल्यामुळे त्यांचे बहुमत झाले. त्यांच्याकडे ८१ पैकी ४४ नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांनी सत्तेसाठी तडजोडी केल्या असून एक वर्षे महापौरपद काँग्रेसकडे तर स्थायी समिती सभापतिपद राष्ट्रवादीकडे देण्याचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार  काँग्रेसच्या अश्‍विनी रामाणे यांना संधी मिळाली. आता त्यांचे एक वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांची धामधूम असल्याने पंधरा दिवस राजीनामा लांबणीवर पडला होता. आता उद्याच्या सभेत मात्र महापौर आणि उपमहापौरांचेही राजीनामे होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: pipeline subject in kmc