पिस्तूलप्रकरणी आणखी एक रडारवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

कोल्हापूर - पिस्तूलप्रकरणी अटक केलेल्या स्वप्नील श्रीकांत शिंदेने पिस्तूल कोठून आणले, याबाबत पोलिसांना माहिती दिली असून, संबधित संशयित पोलिसाच्या रडारवर आला आहे. लवकरच त्याला अटक होणार असल्याची माहिती तपास अधिकारी तृप्ती देशमुख यांनी दिली आहे.

कोल्हापूर - पिस्तूलप्रकरणी अटक केलेल्या स्वप्नील श्रीकांत शिंदेने पिस्तूल कोठून आणले, याबाबत पोलिसांना माहिती दिली असून, संबधित संशयित पोलिसाच्या रडारवर आला आहे. लवकरच त्याला अटक होणार असल्याची माहिती तपास अधिकारी तृप्ती देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान, अटक केलेल्या शिंदेची आज न्यायालयातून जामिनावार मुक्तता झाली. ‘सकाळ’ने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 

दिंडनेर्ली येथे गुरुवारी (ता. २९) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केलेल्या देशी बनावटीच्या पिस्तूल व काडतुसांची चांगलीच चर्चा भागात रंगली आहे. सुरुवातीला या प्रकरणात येवती येथील प्रवीण गुरव याला अटक केली होती. लाखमोलाची उलाढाल करून पोलिसांनी पिस्तूल मालकाला यातून बाहेर काढल्याची उघड चर्चा परिसरात सुरू होती.

‘सकाळ’ने सुरुवातीपासून याचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर पिस्तूल मालक स्वप्नील शिंदेला रविवारी (ता. २) ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल कधी व कोठून आणले, याची चौकशी केली. यातून आणखी एकाचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी संबंधिताचा शोध सुरू केला आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी तृप्ती देशमुख यांनी दिली. 

असे का घडले, हे उघड गुपित 
ही कारवाई पहिल्यापासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहे. सुरुवातीला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी प्रवीण गुरवला अटक झाली; मात्र गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसताना पिस्तूल का बाळगली, याचा सखोल तपास झाला नाही. ‘सकाळ’ने याचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर पिस्तूल मालक स्वप्नील शिंदे असल्याचे समोर आले. गुरवला रेकॉर्डवर आणण्याआधी शिंदेवर कारवाई का झाली नाही, हे उघड गुपित बनले आहे.   

अधीक्षक चौकशी करणार का?
स्वप्नील शिंदेचे नाव यापूर्वी गुन्ह्यात का आले नाही? ते का टाळण्यात आले? त्यामागे नेमके कारण काय? अशा अनेक अनुत्तरित प्रश्‍नांची पोलिस अधीक्षकांकडून चौकशी होणार का, अशीही चर्चा गावात आहे.

संबंधीत बातम्या

पिस्तुलाचा खरा मालक सापडला

Web Title: Pistol Case follow up