योजनांचा पाठपुरावा अधिकाऱ्यांनी करावा - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

कोल्हापूर - राज्य व केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या पूर्ततेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्‍यक असल्याचे मत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथील ताराराणी सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभेत ते बोलत होते. 

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे पुनर्गठण होऊन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच "दिशा‘ समितीचे स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

श्री. शेट्टी म्हणाले, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय सामजिक सुरक्षा कार्यक्रम, तसेच आवास योजना यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्‍यक असून, त्यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपातळीवर प्रबोधन करावे. तसेच शिबिरांचे आयोजन करावे. छत्रपती शाहू टर्मिनस वास्तूला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या वास्तुची दुरुस्ती करणे आवश्‍यक असून तसा प्रस्ताव केंद्राकडे सादर करावा, अशी सूचनाही खासदार शेट्टी यांनी केली.‘‘ 

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, ‘जिल्ह्यात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यादृष्टीने पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, याकरिता शासन पातळीवर उसाचा नगदी पिकांमध्ये अंतरभाव करण्याकरिता तसा ठराव सादर करावा.‘‘ बैठकीत जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी यांच्या पदोन्नतीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विविध योजनांचा आढावा घेऊन सूचना करण्यात आल्या. डॉ. हरिष जगताप यांनी आभार मानले. सभेला विविध समित्यांच्या सभापती, ग्राम विकास अधिकारी खातेप्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: plan Follow-up to the authorities - Raju Shetty