"झाडे लावा, क्‍वार्टर मिळवा' योजना आखली खरी; पण...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी "झाडे लावा, क्‍वार्टर मिळवा' अशी भन्नाट योजना महापालिका स्वच्छता निरीक्षकांनी आखली. ती पोस्ट व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर व्हायरल झाली. ही पोस्ट चांगलीच अंगलट आली.

नगर : वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी "झाडे लावा, क्‍वार्टर मिळवा' अशी भन्नाट योजना महापालिका स्वच्छता निरीक्षकांनी आखली. ती पोस्ट व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर व्हायरल झाली. ही पोस्ट चांगलीच अंगलट आली.

त्यातच महापालिका कामगारांनीही कर्मचाऱ्यांना व्यसनाधीन बनविण्यास प्रोत्साहन देत आक्रमक भूमिका घेतली. त्याची तत्काळ दखल घेत आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख याला निलंबित करण्याचे आदेश दिले. 

सरकारच्या विविध विभागांकडून नागरिक, स्वयंसेवी संस्थांना झाडे लावण्यासाठी आवाहन केले जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती सुरू आहे. त्यातच देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल करून महापालिकेची बदनामी केली. त्यास नोटीस देऊन खुलासाही मागविण्यात आला. मात्र, असमाधानकारक खुलासा असल्याने देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरूच राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plant tree and get liquer Scheme fail